मेट्रोच्या एलिव्हेटेड सेक्शनवर इलेक्ट्रीफिकेशन वायर लावणे सुरु

Date:

नागपूर : एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान ऍडग्रेड (जमीनस्तरावर) सेक्शनवर मेट्रोच्या जॉय राईड संकल्पनेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतांनाच आता एलिव्हेटेड (जमिनीस्तरावरून उंच) सेक्शनवर देखील मेट्रो गाडीच्या संचालनाच्या दृष्टीने एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी मेट्रो जंक्शन दरम्यान मेट्रो ट्रेन चालविण्यासाठी ओव्हरहेड इलेक्ट्रीफिकेशनच्या कार्याला सुरुवात झाली आहे.

मेट्रो चालविण्यासाठी मेट्रो ट्रॅक वरून ६ मीटर पेक्षा ज्यास्त उंचीवर हे इलेक्ट्रीफिकेशन वायर बसविण्यात येतात. मेट्रो ट्रेन चालविण्यासाठी २५ हजार वोल्ट पुरवठ्याची आवश्यकता असते जी या इलेक्ट्रीफिकेशन वायरच्या माध्यमाने पूर्ण होईल. आज पहिल्या दिवशी एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते उज्वल नगर पर्यंत इलेक्ट्रीफिकेशन वायर जोडण्याचे कार्य पूर्ण करण्यात आले. एका विशिष्ठ प्रकारच्या वाहनाच्या साहाय्याने हे कार्य केले जात आहे.

आरआरव्ही (रेल कम रोड व्हेकल) प्रकारच्या गाडीच्या साहयाने मेट्रोचे इलेक्ट्रीफिकेशन वायर (क्याटनरी कंडक्टर) जोडण्याचे कार्य करण्यात येत आहे. आरआरव्ही (रेल कम रोड व्हेकल) हे वाहन दिसायला जरी साध्या ट्रक सारखे असले तरी यात इलेक्ट्रीफिकेशन वायर लावणारे उपकरण बसविण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे हे वाहन मेट्रो ट्रॅक वर चालू शकेल यासाठी लोखंडी चाके लावण्यात आले आहे. या वाहनाला साध्या ट्रकचे चाक लागले असल्याने हे वाहन रोड वर सुद्धा चालण्यास पूर्णपणे सक्षम असते. या वाहनांमुळे इलेक्ट्रीफिकेशन वायर जोडण्याचे कार्य वेगाने आणि वेळेत पूर्ण केले जाणार आहे.

अधिक वाचा : सतरंजीपुरा झोनमधील १५४ तक्रारींवर सुनावणी : नागरिकांच्या मुलभूत सुविधा तातडीने सोडविण्याचे निर्देश

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related