नागपूर : विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. नागपूर शहरात सर्वाधिक रुग्ण वाढत असताना चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील दररोज रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहेत. आजवर कोरोनामुक्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सतत रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे. आज नागपुरात आठ, चंद्रपुरात नऊ रुग्ण तर गडचिरोलीत एक असे एकूण अठरा रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी नऊ जणांचे अहवान पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व रुग्ण चंद्रपुरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल होते. आता जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 12 झाली आहे. यातील पहिल्या रुग्णाच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. जिल्ह्यात 20 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन होती.
वन अकादमीमध्ये 19 मे रोजी संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेले चार नागरिक नाशिक मालेगाव एमआयडीसीमध्ये काम करीत होते. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाने हे चार नागरिक पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे वन अकादमीमध्ये ठेवण्यात आले होते. हे चार नागरिक चिरोली (मूल), जाम (पोंभुर्णा), विसापूर (चंद्रपूर) विरवा (सिंदेवाही) परिसरातील आहेत.
पुणे येथून आलेले पती-पत्नी वरोरा येथे यापूर्वी संस्थात्मक विलगीकरणात होते. सध्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी परिसरातील एक वीस वर्षीय मुलगी सध्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे. तसेच आरवट येथील एकवीस वर्षाचा युवक ठाण्यावरून परत आला होता. तोही वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील 21 वर्षीय युवक दिल्लीवरून परत आला होता. सध्या वैद्यकीय महाविद्यालयात, चंद्रपूर येथे उपचार घेत आहे.
नागरिकांनी घाबरू नये
हे सर्व रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात (इन्स्टिट्यूशनल कॉरंटाइन) आहेत. 19 मे रोजी यांचे स्वॅब घेण्यात आले होते. सर्व नागरिक बाहेरून आले आहेत. त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
नागरिक विलगीकरणात
काला रात्री उशिरा नागपूर येथून प्राप्त अहवालामध्ये नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. हे नऊ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. यापैकी पाच जण वैद्यकीय महाविद्यालयात चंद्रपूर येथे उपचार घेत आहेत. तर चार जण वन अकादमीच्या नव्या इमारतीत संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
नागपूर : शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा आकड फुगत चालला आहे. बुधवारी शहरात तब्बल 13 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यात गुरुवारी आठ रुग्णांची भर पडली. यामुळे शहरातची चिंता चांगलीच वाढली आहे. आज झालेल्या वाढमुळे एकूण रुग्ण संस्या 395 झाली आहे. नागपूर लवकरच चारशे पल्ला गाठेल यात कोणतीही शंका नाही. समाधानाची बाब म्हणजे शहरात मृत्यूदर खूप कमी आहे. जवळपासू चारशे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असताना फक्त सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
गडचिरोली : आजवर कोरोनामुक्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी जिल्ह्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. जिल्ह्यात मुंबई येथून आलेल्या प्रवाशांनी प्रशासनाची झोप उडवली आहे. आजचा रुग्ण धरून जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा नऊवर जाऊन पोहोचला आहे.
Also Read- बुलडाणा; 28 दिवसांत एकही नवीन रूग्ण नाही ; 7 कन्टेन्टमेंट झोन वगळले