इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाला तीन वर्षे लागणार असून २०२० पर्यंत हे स्मारक पूर्ण होईल. स्मारकासाठीची संपूर्ण साडेबारा एकर जागा ताब्यात आली असून बांधकामाला सुरुवात झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात आमदार प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी सूचना मांडली. त्यावरील चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.
इंदूमिलची संपूर्ण साडेबारा एकरची जागा राज्य सरकारच्या ताब्यात आली असून प्रॉपर्टी कार्डवर नावही लागले आहे. सर्व नकाशे मंजूर झाले असून जोत्यापर्यंतच्या बांधकामाची परवानगी मिळाली आहे. सीआरझेड क्षेत्राबाहेरील जमिनीवर बांधकाम सुरू झाले आहे. यासाठी एमएमआरडीएने १५० कोटी रुपये दिले आहेत. पैशाची कमकरता भासणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राजकुमार बडोले यांच्या समितीने या स्मारकासाठी आंदोलन केलेल्या प्रत्येक संघटनेशी, नेत्यांशी भेटून आराखडय़ाची चर्चा केली आहे. सर्व आमदारांनी ही याचे सादरीकरण केले जाईल. हे काम पूर्ण करण्यास तीन वर्षांची मुदत आहे. २०२० पर्यंत काम पूर्ण होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्व अडचणी दूर करणार
सरकार मंद गतीने काम सुरू आहे असा आरोप संजय दत्त यांनी केला, तर प्रकाश गजभिये यांनी नकाशे मंजूर नसताना काम करत नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोप फेटाळून लावत, जर तुम्ही आरोप करणार असाल तर तुम्ही १५ वर्षे सत्तेत असताना जागा ताब्यात न घेता आराखडय़ासाठी कॉम्पिटेशन केली. यात राजकीय अभिनिवेश नाही. तुम्ही जेवढे बाबासाहेबांना मानता, तेवढा मी ही मानतो. जेथे अडचनी येतील, त्या दूर केल्या जातील असे सांगितले.
अधिक वाचा : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या साधेपणाने पोलिस दादा भारावले