गुगलचे हे काम करा आणि जिंका १,००,००० रुपये

गुगल

मुंबई : आपल्या डिजिटल पेमेंट अॅप ‘गुगल पे’वर इंटरनेट क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी गूगलने मोठी घोषणा केली आहे. या अॅपला लाँच होऊन १८ सप्टेंबरला वर्ष पूर्ण होत आहे. तुम्हाला १ लाख रुपये जिंकण्याची संधी त्यानिमित्ताने मिळणार आहे.

या अॅपवर यानिमित्त १८ सप्टेंबरपर्यंत पाच व्यवहार केल्यास पाच रुपयांपासून १ लाख रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. Google Pay च्या वर्षपूर्तीनिमित्त गुगलने ऑफर जाहीर केली आहे. एकूण ५ कोटींची बक्षिसे यामध्ये दिली जाणार आहेत. तसेच दुसऱ्या बँक खात्यात पैसे पाठविणे, दुकानदाराला कॅश मोडमध्ये पैसे देणे, दुकानदाराच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठविणे आणि गूगल पे (तेज) युपीआय आयडीच्या युजर्सना पैसे पाठविणारे युजर्स या ऑफरमध्ये पात्र होणार आहेत.

एका यूजरला ऑफरकाळात एकदाच बक्षीस मिळणार आहे. त्यासाठी पैसे पाठवणाऱ्याकडे गूगल पेचे अपडेट व्हर्जन असायला हवे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) द्वारे बनविल्या गेलेल्या यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआई) सिस्टीमवर आधारित गूगल पे हे अॅप आहे. १८ सप्टेंबरच्या सकाळी ९ वाजेपर्यंत यासाठी व्यवहार करावे लागणार आहेत . या ऑफरसाठी केवळ गूगल पेच्या अॅपवरून दुसऱ्याबाजुच्या पे अॅपवर व्यवहार करणारेच पात्र ठरणार आहेत.

अधिक वाचा : INR Vs USD; Rupee Collapses; breaches 71 for the first time