दहा तासांचे ऑपरेशन करोना

Date:

नागपूर: दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या मरकजमध्ये नागपूरचे ५६जण सहभागी असल्याची वार्ता शहरात धडकली आणि एकच खळबळ उडाली. मंगळवारी रातोरात २२ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तब्बल दहा तास ‘ऑपरेशन करोना’ राबविण्यात आले आणि ५४ जणांना ताब्यात घेतले गेले. त्यांना आमदार निवासमध्ये स्थानबद्ध करण्यात आले असून, त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात एक धार्मिक कार्यक्रम झाला. त्यात हजारो लोक सहभागी झाले होते. त्यातील अनेकांना पुढे करोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या कार्यक्रमात कोण कोण उपस्थित होते, याचा शोध घेतला गेला. देशातील अनेक राज्यांतील लोकांची त्यात उपस्थिती असल्याचे आढळून आल्याने त्या-त्या राज्यांना आणि शहरांना सावध करण्यात आले.

समाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा!

दिल्लीहून आली यादी

मरकजमध्ये सहभागी झालेल्या लोकांमध्ये महाराष्ट्रातील किती लोक होते, याची यादी दिल्ली सरकारने महाराष्ट्र सरकारला पाठवली. राज्य सरकारने त्यातील नागपूरच्या ५६ जणांची यादी नागपूर महापालिकेला पाठविली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांना माहिती दिली आणि पुढे काही तास शहरभर एकच ऑपरेशन चालले.

२२ पथके तयार

यादी हातात पडताच पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी या संशयित नागरिकांच्या धरपकडीसाठी ‘ऑपरेशन करोना’ राबविण्याचा निर्णय घेतला. उपाध्याय, कदम यांनी विशेष शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांच्याकडे या मोहिमेची सूत्रे सोपविली. खेडकर यांनी विशेष शाखा व गुन्हेशाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरुवातीला नागरिक राहत असलेल्या ठिकाणांची माहिती काढली. ५४ नागरिक शहरातील २२ पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहत असल्याचा निष्कर्ष खेडकर यांनी काढला. त्यानुसार या २२ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना तत्काळ पथक तयार करण्यास सांगितले. त्यानुसार २२ पथके तयार करण्यात आली. यात एक अधिकारी व पाच कर्मचाऱ्यांच्या समावेश होता. पथक तयार होताच पोलिस आयुक्तांनी पथकातील कर्मचाऱ्यांना सावधगिरीच्या सूचना करीत डॉक्टरांचाही समावेश करण्याचे निर्देश दिले.

Coronavirus: 121 prisoners released from Nagpur jail, 2117 from Maha so far

सलग दहा तास

श्वेता खेडकर यांनी या संशयितांच्या धरपकडीसाठी फुल प्रूफ प्लान तयार केला. रात्री ८ वाजताच्या सुमारास पोलिसांनी ‘ऑपरेशन करोना’ राबवायला सुरुवात केली. रातोरात जागोजागी पोलिसांचे डग्गे पोहोचले. यादीतील लोकांना ताब्यात घेतले. ही कारवाई पहाटे ६ वाजेपर्यंत चालली.

मुक्काम आमदार निवास

ताब्यात घेतलेल्या सगळ्या व्यक्तींना आमदार निवासमध्ये स्थानबद्ध करण्यात आले. तिथेच त्यांचे नमुने घेण्यात आले आणि ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांचे नमुने निगेटिव्ह आले तर त्यांची मुक्तता केली जाईल, ते पॉझिटिव्ह आले तर त्यांच्या परिवारासही तपासणीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.

दहाजण परप्रांतीय

धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले दहा नागरिक हे अन्य राज्यांतील असून, ते कार्यक्रम संपल्यानंतर नागपुरातच वास्तव्यास होते. या दहा नागरिकांचे पत्ते शोधण्यास पोलिसांना मोठी अडचण गेली. परंतु, अनुभवाचा फायदा घेत पोलिस तेथपर्यंत पोहोचले. दिल्लीहून नागपुरात परतलेल्या काही नागरिकांनी स्वत: डॉक्टरकडे जाऊन तपासणी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Also Read- Suspect from Nizamuddin gathering of Tablighi Jamaat admitted in GMCH Nagpur

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Top 10 Email Migration Software for Gmail in 2024

Email migration can be a daunting task, especially when...

Top Best Bulk SMS Service Providers in India

Below is the list of companies currently providing top...

Top Digital Marketing Innovators to Watch in 2025

As an online business in the digital world, where...

ICSI Workshop in Nagpur : “Decoding Companies Act” for Compliance and Governance

Nagpur : Nagpur Chapter of ICSI organized a Workshop...