Diwali 2021 : आज वसुबारस… म्हणजेच, गोवत्स द्वादशी! जाणून घ्या महत्त्व?

Date:

Diwali 2021 : कोरोना संकटात संपूर्ण देशभरात दिवाळी आनंदानं पण साधेपणाने साजरी केली जाणार आहे. सध्या राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून प्रशासनाकडूनही अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.त्यामुळे यंदाची दिवाळी आनंदात आणि उत्साहात साजरी होणार आहे. सगळीकडे दिवाळीची तयारी सुरु आहे. अशातच आजपासून दिवाळीला सुरुवात होत आहे.

आज गोवत्स द्वादशी म्हणजेच, वसुबारस . अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते. गोवत्सद्वादशी म्हणजे, गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजेच, द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात.

भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. आश्‍विन वद्य द्वादशी, या तिथीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हणतात. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून वसुबारस हे व्रत करण्यात येतं. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.

वसुबारस व्रत :

या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.

वसुबारस म्हणजेच गोवत्सद्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीतही केला जातो. पण तंस पाहायला गेलं तर, तो सण वेगळा असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासूनच दिवाळीला सुरुवात होते, हा दिवाळीचा पहिला दिवा असतो, असं मानलं जातं. यंदा सोमवार, म्हणजेच, 01 नोव्हेंबर 2021 रोजी निज अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे वसुबारस आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.

यंदाच्या दिवाळीचे महत्त्वाचे दिवस :

वसुबारस : निज अश्विन कृष्ण द्वादशी – 1 नोव्हेंबर, 2021

धनत्रयोदशी : निज अश्विन कृष्ण त्रयोदशी – 2 नोव्हेंबर, 2021

नरक चतुर्दशी : लक्ष्मीपूजन : निज अश्विन अमावास्या – 4 नोव्हेंबर, 2021

बलिप्रतिपदा/पाडवा : कार्तिक शुद्ध प्रतिपदा – 5 नोव्हेंबर 2021

भाऊबीज : कार्तिक शुद्ध द्वितीया – 6 नोव्हेंबर 2021

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Sitabuldi Fort to Open for Public on Republic Day 2026 – A Rare Heritage Experience in Nagpur

Nagpur is gearing up for a memorable Republic Day...

The Story of Nagpur : From Ancient Roots to Modern Orange City

Nagpur : fondly known as the Orange City of...

India vs New Zealand T20i in Orange City Nagpur Jamtha on January 21, 2026

Cricket fever is ready to grip Nagpur once again...