अमरावती महामार्गावर ट्रक अपघातात तरुणीचा जागीच मृत्यु

Date:

नागपूर : वाडी येथे पो.स्टे. समोर अमरावती महामार्गावर ट्रक अपघातात मंगळवार (२३ एप्रिल) रोजी एका तरुणीचा जागीच मृत्यु झाला. पूजा ओमप्रकाश तिवारी वय 28 वर्षे नवनित नगर असे मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे. ती आपल्या होन्डा एक्टिवा या ‘टू व्हिलर’ने कामावर जात असताना हा अपघात झाला.

प्राप्त माहिती नुसार, पूजा ही वाडी-हिंगणा अमरावती महामार्गावर असलेल्या अजमेरा टायर्स येथे अकाऊंट विभागात कार्यरत होती. नेहमीप्रमाणे पूजा हि सकाळी १० वाजताच्या सुमारास आपल्या MH40-BB-1330 या होन्डा एक्टिवा या ‘टू व्हिलर’ने घरुन कामावर जायला निघाली. वडधामना येथील टीसीआय एक्सप्रेस येथून ओडीसा कडे जात असलेल्या ट्रक क्रमांक एमएच १२ एमव्ही ४६०० याच्या मागच्या लोखंडी बफरला पूजा हिची ओळणी अडकल्यामुळे तिची ‘टू व्हिलर’ट्रकच्या मागच्या चक्क्यात आली. ट्रक ने पूजा ला काही अंतरापर्यंत फरकडत नेले अन तिचा घटनास्थळीच मृत्यु झाला. यात तिच्या डोक्यावर असलेले ‘हेल्मेट’ही चकणाचूर झाल्याचे प्रत्यक्ष दर्शिंनी सांगितले. पूजा हि ओमप्रकाश तिवारी यांची एकूलती एक मुलगी होती. अभ्यासात हुशार अन मिलनसार स्वभावाची पूजा होती. तिच्या दुर्देवी मृत्यु मुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे.

ट्रक चालक शिवलाल रामप्रसाद शिंदे (३०) टाकळखेड चिखली बुलढाणा रहिवासी याला वाडी पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा तपास पोलिस निरिक्षक राजेंद्र पाठक व त्यांची चमू करीत आहे. या घटनेमुळे वाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिक वाचा : अपघातात महिलेसह दोन जण ठार

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Why IT companies in Pune Hinjewadi Continues to Attract IT Companies?

Hinjewadi is the western district of Pune which has...

New IT Companies in Pune Hinjewadi: Pune’s Growing Tech Hub

Hinjewadi is the western district of Pune which has...

Happy Children’s Day 2024: Celebrate the Future, Honor the Present

  Happy Children's Day 2024: Celebrate the Future, Honor the...

India’s largest Multinational IT companies growing in 2025

There are List of Top 10 MNC's in India...