नागपुर : राज्यात सोमवारी काँग्रेस पक्षाने भारत बंद मध्ये सक्रीय सहभाग घेतला. नागपुरातही याचे पडसाद पाहायला मिळाले. गोंदिया, भंडारा, अमरावती, अकोला, बुलढाना, वाशिम, वर्धा, यवतमाल, चंद्रपुर अणि गड़चिरोली मध्ये बंद चा असर पाहायला मिळाला. शहरात कांग्रेस कडून काही दुकाने, पेट्रोल पंप, बाजार बंद केले गेले.
बर्डी मोबाइल मार्केट पूर्णता बंद राहिले. विदर्भात काँग्रेस पक्ष गटातटात विभागला गेला आहे. मात्र, बंदच्या निमित्ताने सर्व नेते एकत्र आले. यामुळे, काँग्रेसचे दुरावलेले नेते एकत्र येतील, अशी आशा काँग्रेस समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.
विदर्भातील काँग्रेसला गटातटाचे राजकारण नवीन नाही. प्रत्येक नेत्याचा वेगळा गट आहे.
काँग्रेसची विदर्भात चांगली ताकद आहे. मात्र, या गटांमुळे आजपर्यंत फटका बसत आला आहे. काँग्रेससाठी ही नेहमीच डोकेदुखी राहिली आहे. सोमवारच्या बंददरम्यान मात्र काँग्रेसचे दिग्गज नेते एकत्र आलेले दिसले. विलास मुत्तेमवार, नितीन राऊत हे नेते रॅलीत सामील झाले. यामुळे, काँग्रेस समर्थकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सर्व नेते मतभेद विसरुन एकत्र आले तर याचा फायदा पक्षाला होईल असे समर्थकांना वाटत आहे.
गटातटाच्या राजकारणाने काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हे नेते एकत्र आल्यास विदर्भात काँग्रेसची ताकद निश्चीत वाढेल असे जाणकारांचे मत आहे.
अधिक वाचा : बघा फोटोज: शहराची ऐतिहासिक परंपरागत “मारबत उत्सव” पार पडला