देशात गेल्या २४ तासांत नोंद झालेल्या आकडेवारीनं आजवरचे करोना संक्रमणाचे सगळे रेकॉर्ड तोडलेत. गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात बुधवारी (५ मे २०२१) एकूण ४ लाख १२ हजार २६२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत ३९८० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दिवशी तब्बल ३ लाख २९ हजार ११३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी १० लाख ७७ हजार ४१० वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ३० हजार १६८ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ७२ लाख ८० हजार ८४४ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३५ लाख ६६ हजार ३९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी १० लाख ७७ हजार ४१०
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ७२ लाख ८० हजार ८४४
उपचार सुरू : ३५ लाख ६६ हजार ३९८
एकूण मृत्यू : २ लाख ३० हजार १६८
करोना लसीचे डोस दिले गेले : १६ कोटी २५ लाख १३ हजार ३३९