CoronaVirus: सीटी स्कॅन तीनशे छातीच्या एक्स-रे प्रमाणे, हे अत्यंत नुकसानकारक; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

CoronaVirus: सीटी स्कॅन तीनशे छातीच्या एक्स-रे प्रमाणे, हे अत्यंत नुकसानकारक; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

कोरोनाच्या नवीन लाटेमध्ये आरटी-पीसीआर चाचणीत संसर्ग आढळला नसल्याचे बर्‍याचवेळा अहवालात समोर आले आहेत. मग लक्षण दिसत असल्यास रुग्णांनी सीटी स्कॅन रायला हवं का? असा प्रश्न लोकांना पडत आहे. परंतु आता एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी इशारा दिला आहे की सिटी स्कॅनचा वापर करायचा की नाही ते विचारपूर्वक ठरवायला हवे. त्यांनी सोमवारी आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सांगितले की,” सीटी स्कॅन तीनशे छातीच्या एक्स-रे प्रमाणे आहे, हे अत्यंत नुकसानकारक आहे.”

गुलेरिया यांनी असे म्हटले आहे की, ”घरात आयसोलेशनमध्ये राहणारे लोक त्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधत असतात. सेचुरेशन ९३ किंवा त्याहून कमी होत आहे, हे अशक्त होण्याचे लक्ष आहे. अशा स्थितीत जर आपल्याला छातीत दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.”

आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीत असे सांगितले गेले आहे की जास्त बाधित राज्यांव्यतिरिक्त काही राज्यांमध्ये कोरोनाचे प्रकार वाढत आहेत. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि मेघालय ही राज्ये आहेत. २ मे रोजी रिकव्हरी रेट ७८ टक्के होता जो ३ मे रोजी ८२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

या सुरुवातीच्या सकारात्मक गोष्टी आहेत ज्यावर आपल्याला सतत काम करावे लागणार आहे. दिल्ली आणि मध्य प्रदेशात नवीन प्रकरणांच्या संख्येत घट दिसून येत आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की जर आपण संपूर्ण देशातील कोरोना मृत्यू दर पाहिला तर ते अंदाजे १.१० टक्के इतका आहे.

दरम्यान सीडीसीने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार कोरोना संसर्गापासून २ सर्जिकल मास्क किंवा कापडाचे मास्क वापरणं टाळा. यामुळे कोणताही फायदा होणार नाही. श्वास घ्यायला त्रास होईल. एन ९५ मास्क तुमच्या तोंडाला व्यवस्थित बसेल तसंच सुरक्षाही प्रदान करेल. तुलनेनं सर्जिकला मास्कची फिटिंग एव्हढी चांगली नसते. थोडावेळ वापरल्यानंतर तो लूज पडतो. कापडाचा मास्क ३ लेअर्सचा असेल तर ७७ टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळू शकतं.

कितीवेळा वापरता येऊ शकतो एक मास्क?

एन ९५ मास्क तुम्ही जास्तीत जास्त पाचवेळा वापरू शकता. सर्जिकल मास्क एकदा वापल्यानंतर फेकून द्यायला हवा. कापडचा मास्क वापरत असल्यास धुवून तुम्ही पुन्हा त्याचा वापर करू शकता. घाणेरडा मास्क वापरू नका, मास्कवर सॅनिटायजर किंवा कोणतंही केमिकल टाकू नका.