नागपुरात कोरोनाने गाठली शंभरी

Date:

नागपूर : कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येने नागपुरात शुक्रवारी शंभरचा आकडा गाठला आहे. कालपर्यंत ९८ रूग्ण संख्या असलेल्या उपराजधानी नागपुरात शुक्रवारी आणखी दोन रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रूग्ण संख्या १०० एवढी झाली आहे.

बेघर निवारा केंद्रातील रहिवाश्यांना मनपातर्फे मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण!

मागील संपुर्ण आठवडाभर नागपुरात दर दिवशी कोरोनाबाधित रूग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ही वाढ कायम असून नागपुरातील दोन आकड्यात असलेली रूग्ण संख्या तीन आकड्यात पोहोचली आहे. सातत्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असलेल्या नागपुरात मागील २१ दिवसांत तब्बल ८४ नव्या रूग्णांची वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीला सुरू होण्यापूर्वी शहरातील कोरोनाबाधितांचा रूग्णांची संख्या १६ एवढी होती. नव्याने कोरोनाचे संक्रमण झालेल्यांमध्ये ५२ वर्षीय पुरुष आणि ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

Also Read- सतरंजीपुराच्या ‘त्या’ रुग्णाच्या संपर्कातील दोघे उपचारानंतर घरी परतले

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related