नागपूर : नागपुरात कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत बुधवारी सलग चौथ्या दिवशी मोठी वाढ झाली आहे. नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा शंभरी नजीक पोहोचला आहे. नागपुरातील कोरोनाबाधितांची रूग्ण संख्या दर दिवशी वाढतच आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत (दि २२ ) नागपुरात कोरोनाचे आणखी ८ नवे रूग्ण आढळले.
रविवारी एकाच दिवशी नागपुरात ९ रूग्ण आढळले. त्यानंतर सोमवारी ७ रूग्ण आणि सलग तिसर्या दिवशी मंगळवारी ७ रूग्णांची भर पडली होती. त्यात बुधवारी ८ रूग्णांची भर पडून कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ९० वरून ९८ वर पोहोचली आहे. या नव्या ८ कोरोना रूग्णांमुळे नागपुरातील कोरोनाबधितांची एकूण संख्या पुन्हा वाढली आहे.
नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येत रविवारी सर्वात मोठ्या रूग्ण संख्येची वाढ नोंदविण्यात आली होती. रविवारी एकाच दिवशी नागपुरातील ९ संशयीत रूग्णाचे थ्रॉ स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे उपराजधानीतील जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.
Also Read- नागपुरातील भालदारपुरा परिसर सील