30 टक्के लहान मुलांना कोरोना होऊन गेला?

Date:

Third Wave: तिसऱ्या लाटेला कशा पद्धतीनं सामोरं जायचं याचीही तयारी सुरु आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचं सांगितलं जात आहे.

नवी दिल्ली, 27 मे: सध्या भारत देश कोरोना व्हायसर (corona Virus) च्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. तर दुसरीकडे देश तिसऱ्या लाटे (third wave)ला कशा पद्धतीनं सामोरं जायचं याचीही तयारी सुरु आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आवश्यक अशी व्यवस्था करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहेत.

The Indian Academy of Paediatrics नं केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. या पत्रात कोरोनाची तिसरी लाट आल्यास लहान मुलांना किती प्रभावीपणे वाचवलं जाऊ शकतं हे नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान कोविड 19 ची लागण झाल्यानंतर होणारे परिणाम हे जास्त गंभीर असण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस सारखा संसर्ग होण्याचा धोका असल्याचंही इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिशियन्सचे संसर्गजन्य रोग अध्यक्ष डॉ. रविशंकर म्हणाले. सीरम करत असलेल्या सर्व्हेनुसार, कर्नाटकातील काही डॉक्टर रुग्णालयात जाऊन तिथे येणाऱ्या लहान मुलांची तपासणी करत आहेत. तसंच त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरस अँटीबॉडीज आहेत का याचीही तपासणी सुरु आहे.

30 टक्के मुलांना होऊन गेला कोरोना?

30 टक्के मुलांना आधीच संसर्ग झाला असून ते त्यातून बरे झाले असल्याची माहिती रविशंकर यांनी दिली. आतापर्यंत घरातल्या मोठ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कुटुंबातील मोठ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं मुलांना सहज त्याची लागण होण्याची शक्यता असल्याचं डॉ. रविशंकर यांनी सांगितलं. बऱ्याच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समजतं नाही आणि अशा लोकांनी या कोरोनावर मात देखील केली आहे, असंही डॉ. रविशंकर म्हणालेत. तरुण मुलांच्या फुफ्फुसांमध्ये रिसेप्टर्स (An organ) पुरेसे नसतात, त्यामुळे कोविडमुळे होणारे गंभीर नुकसान हे कमीच अपेक्षित असतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Max Super Speciality Hospital, Nagpur, Launches Centre of Excellence for Advanced Robotic Joint Replacement

Nagpur :  Max Super Speciality Hospital, Nagpur, has announced...

MMTC-PAMP Launches Its First Exclusive Store in Nagpur, Brings Its 24k, 999.9+ Purest Gold and Silver Portfolio

Nagpur’s inclusion marks a strategic step in MMTC-PAMP's...

Holi Rang Utsav Nagpur 2026 – The Ultimate Festival of Colours

Holi in Nagpur this year is not just a...