नागपूर : कंत्राटदाराची आत्महत्या, तीन बिल्डरांना अटक

Date:

नागपूर : अनमोलनगरमधील जयराम अपार्टमेंटच्या सहाव्या माळ्यावर टाइल्स फिटिंग कंत्राटदाराने विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आत्महत्येसप्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तीन बिल्डरांना अटक केली.

हिरेंद्र भाऊराव निमकर (वय ४६, रा. लकडगंज), कमलेश ईश्वरचंद चंदिरमानी (वय ३६) आणि जगदीश दिगंबरभाई पटले (वय ४५, रा. घाट रोड) अशी अटकेतील बिल्डरांची नावे आहेत. तिघेही जयराम बिल्डर्समध्ये भागीदार आहेत. तिघांची तीन दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

संतोष पांडुरंग बावनगडे (वय ६०, रा. विनोबा भावेनगर) असे मृतकाचे नाव आहे. जयराम बिल्डर्सतर्फे जयराम अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहे. फ्लॅटमध्ये टाइल्स बसविण्याचे कंत्राट बावनगडे यांच्याकडे होते. बुधवारी नागपंचमी असल्याने बावनगडे यांना मजुरांना पैसे द्यायचे होते. त्यांनी बिल्डरांकडे थकीत पैसे मागितले. ‘फ्लॅटची विक्री झाल्यानंतरच पैसे मिळतील’, असे त्यांनी बावनगडे यांना सांगितले.

बावनगडे यांनी मजुरांना देण्यासाठी दहा हजार रुपये देण्याची विनवणी बिल्डरांना केली. परंतु, तिघांनी त्यांना पैसे दिले नाही. त्यांचा अपमानही केला. मजूर पैशांची मागणी करतील, अशी कल्पना असल्याने बावनगडे यांनी जयराम अपार्टमेंटच्या सहाव्या माळ्यावरील पायऱ्यांवर विष प्राशन केले. तत्पूर्वी आपल्या आत्महत्येस बिल्डर्स जबाबदार असल्याची चिठ्ठी त्यांनी लिहून ठेवली. अन्य मजुरांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. बावनगडे यांच्याकडे आढळलेल्या चिठ्ठीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिघांना अटक केली. तिघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली.

अधिक वाचा : नौकरी दिलाने के नाम लोगों को ठगने वाला फरार आरोपी गिरफ्तार

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Max Super Speciality Hospital, Nagpur, Launches Centre of Excellence for Advanced Robotic Joint Replacement

Nagpur :  Max Super Speciality Hospital, Nagpur, has announced...

MMTC-PAMP Launches Its First Exclusive Store in Nagpur, Brings Its 24k, 999.9+ Purest Gold and Silver Portfolio

Nagpur’s inclusion marks a strategic step in MMTC-PAMP's...

Holi Rang Utsav Nagpur 2026 – The Ultimate Festival of Colours

Holi in Nagpur this year is not just a...

President Of India Inaugurates National Arogya Fair 2026 At Shegaon

Ayush Systems Of Medicine Have Made An Invaluable Contribution...