नागपूर : राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागपुरात शुक्रवारी ‘मिशन बिगिन अगेन’ च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली. प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित शहरातील दुकाने आणि आस्थापना सशर्तपणे सुरू झाल्यात. बाजारात चांगला उत्साह होता. लोकांची वर्दळ होती. परंतु दुकानांच्या दिशा संदर्भात संभ्रमाचे वातावरण होते. शंका दूर करण्यासाठी दुकानदारांनी झोनच्या सहायक आयुक्तांकडे संपर्क साधला. चौकशी करणाऱ्याची वाढती संख्या लक्षात घेता संभ्रम निर्माण झाल्याचे स्पष्ट झाल्याने मानपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुधारित आदेश काढला.
त्यात ऑड तारखेला उत्तर व पूर्व दिशेला शटर असलेली तर आणि ईव्हन तारखेला दक्षिण आणि पश्चिम दिशेला प्रवेशव्दार असलेली दुकाने उघडतील.
आधी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत वेळ होती. नवीन आदेशात वेळेची मर्यादा नाही. परंतु रात्रीच्या संचारबंदीपूर्वी घरी पोहोचणे बंधनकारक असेल. राज्य सरकारच्या आदेशानुसार ३० जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन सुरू राहणार आहे. यामध्ये सवलती देण्यात आल्या आहेत. प्रतिबंधित भागात निर्बंध कायम राहील.
नागपुरात रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू राहील. नागपुरात ८ जूनपासून आणखी सवलती मिळण्याला सुरुवात होईल. जुन्या आदेशाबाबत गुरुवारी मानपा अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. हा आदेश अगदी स्पष्ट असल्याचा दावा अधिकाºयांनी केला होता. तर दुकान सुरू करण्याच्या दिशा संदर्भात संभ्रम निर्माण होणार असल्याचे म्हटले होते.
जेव्हा अधिकारी त्यांच्या भूमिकेवर ठाम होते, तेव्हा लोकमतने आपल्या बातमीत नमूद केले होते की , संभ्रम असल्यास व्यापाºयांनी झोनच्या सहायक आयुक्तांशी संपर्क साधावा. शुक्रवारी अनेक व्यापाºयांनी अधिकाºयांना फोन करुन विचारणा केली. अखेर आयुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांना सुधारित आदेश जारी करावा लागला. सुधारित आदेश जारी होताच उपस्थित केलेला मुद्दा योग्य असल्याचे स्पष्ट झाले. उल्लेखनीय असे की, १ जून रोजी जारी केलेल्या आदेशानुसार आॅड तारखेस उत्तर ते पूर्व आणि दक्षिण ते पूर्वेकडील दुकाने आणि ईव्हन तारखेला उत्तर ते पश्चिम आणि दक्षिण ते पश्चिम दिशेकडील शटरची दुकाने सुरु होतील. असे म्हटले होते.
सुधारित आदेश स्पष्ट
५जून रोजी जारी केलेल्या आयुक्तांच्या सुधारित आदेशात आॅड तारखेला उत्तर व पूर्वेकडील दुकाने तर ईव्हन तारखेला दक्षिण ते पश्चिम दिशेकडील शटरची दुकाने उघडली जाणार असल्याचे स्पष्ट झाल्याने संभ्रम दूर झाला आहे.
असे असतील व्यवहार
मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व बाजारपेठा आणि दुकाने उघडली जातील.
कपड्यांच्या दुकानात ट्रायल रूम बंद असतील. रेडिमेड कपडे परत करण्याची किंवा बदलीची परवानगी नाही.
बाजारात, शारीरिक अंतराचे पालन करण्यासाची जबाबदारी दुकानदारांची राहील.
दुकानदारांना होम डिलिव्हरी, टोकन पध्दत आणि मार्किंग पद्धतीचा अवलंब करावा लागेल.
नियमांकडे कुठेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत असल्यास, दुकान किंवा बाजार बंद करण्याचा महापालिकेला पूर्ण अधिकार राहील.
टॅक्सी-कॅब, ई-रिक्षा, चारचाकी वाहनांसाठी वन प्लस टू सूत्र लागू केले जाईल तर आवश्यक काम असल्यास दुचाकीवरून एकाच व्यक्तीला जाता येईल.
Also Read- CoronaVirus in Nagpur : नागपुरात ५६ रुग्ण पॉझिटिव्ह : २५ मे नंतर पहिल्यांदाच रुग्णांचा उच्चांक