नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

Date:

नागपूर : नागपूर शहराचा मध्य भाग व उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. मंत्रालयात झालेल्या बैठकीत महामेट्रोच्या वतीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमोर नागपूर मेट्रो टप्पा २ चे सादरीकरण करण्यात आले. यावेळी ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधीर पारवे आदी उपस्थित होते.

नागपूर शहरामध्ये मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात नागपूर शहराचा मध्यभाग व उपनगर जोडले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे 11 हजार 216 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा हिस्साही असणार आहे.

नागपूर मेट्रो टप्पा 2 ची वैशिष्ट्ये

नागपूर मेट्रो टप्पा 2 हा 48.3 किमीचा आहे. यामध्ये एकूण 35 स्थानिकांचा समावेश

मेट्रो 1 ए – मिहान ते औद्योगिक विकास महामंडळ ईएसआर (18.7 किमी)

मेट्रो 2 ए – ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हान नदी (13 किमी)

मेट्रो 3 ए – लोकमान्य नगर ते हिंगणा (6.6 किमी)

मेट्रो 4 ए – पार्डी ते ट्रान्सपोर्ट नगर (5.5 किमी)

मेट्रो 5 – वासुदेव नगर ते वाडी (4.5 किमी) टप्पा 2 मुळे 2024 मध्ये 2.9 लाख प्रवाशी प्रतिदिवस वाहतूक क्षमता निर्माण होणार आहे. टप्पा 1 व 2 मुळे एकूण 5.5 लाख प्रवाशी प्रतिदिवस वाहतूक क्षमता निर्माण होणार आहे.

अधिक वाचा : नागपूर-गोवा गाडी सुरू करा – सचिव बसंतकुमार शुक्ला

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Max Super Speciality Hospital, Nagpur, Launches Centre of Excellence for Advanced Robotic Joint Replacement

Nagpur :  Max Super Speciality Hospital, Nagpur, has announced...

MMTC-PAMP Launches Its First Exclusive Store in Nagpur, Brings Its 24k, 999.9+ Purest Gold and Silver Portfolio

Nagpur’s inclusion marks a strategic step in MMTC-PAMP's...

Holi Rang Utsav Nagpur 2026 – The Ultimate Festival of Colours

Holi in Nagpur this year is not just a...