‘चार वर्षांपासून सुरू झालेल्या स्वच्छतेच्या मोहिमेला देशातील प्रत्येक स्तरातील लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. प्रत्येकाने या मोहिमेत भाग घेतला असून आतापर्यंत ४५० जिल्हे हागणदरीमुक्त झाले आहेत. गेल्या ६०-७० वर्षात जे झालं नाही, ते गेल्या चार वर्षात करून दाखवलं’, असं सांगतानाच ‘केवळ शौचालये बनवल्याने भारत स्वच्छ होणार नाही, तर स्वच्छता ही सवय झाली पाहिजे’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी सर्वसामान्य जनतेसह बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी अध्यात्मिक गुरु जग्गी वासूदेव यांच्याशीही संवाद साधला. केवळ माझ्या संकल्पनेनुसार सरकार स्वच्छता मोहिमेवर काम करत असेल तर तेवढं पुरेसं नाही. त्यासाठी सरकार आणि प्रत्येकाने वैयक्तिक प्रयत्न केले पाहिजेत, असं मोदी म्हणाले.
क्या कोई ये सोच सकता था कि भारत में 4 वर्षों में करीब 9 करोड़ शौचालयों का निर्माण हो जाएगा?
क्या किसी ने ये कल्पना की थी कि 4 वर्षों में लगभग 4.5 लाख गांव खुले में शौच से मुक्त हो जाएंगे?
— PMO India (@PMOIndia) September 15, 2018
सर्व भारतीय आणि स्वच्छता प्रेमींनी या मोहिमेत भाग घेतल्यानेच स्वच्छता मोहीम यशस्वी झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार स्वच्छता मोहिमेमुळे आतापर्यंत ३ लाख लोकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत, असं सांगतानाच केवळ शौचालये बनवल्याने भारत स्वच्छ होणार नाही, तर स्वच्छता ही सवय झाली पाहिजे. तो रोजच्या कामाचा एक भाग झाला पाहिजे, असंही मोदी म्हणाले.
चार वर्ष पहले शुरु हुआ स्वच्छता आंदोलन अब एक महत्वपूर्ण पड़ाव पर आ पहुंचा है। हम गर्व के साथ कह सकते हैं कि राष्ट्र का हर तबका, हर संप्रदाय, हर उम्र के मेरे साथी, इस महाअभियान से जुड़े हैं। गांव-गली-नुक्कड़-शहर, कोई भी इस अभियान से अछूता नहीं है: PM @narendramodi #SHS18
— PMO India (@PMOIndia) September 15, 2018
अधिक वाचा : अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मागणी