नागपुर :- मध्य रेल्वे नागपुर विभागातील आरोग्य निरीक्षकावर हल्ला कारणाऱ्याला अटक करावी, या मुख्य मागणीसाठी नागपुर रेल्वे स्थानकावरील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी प्लेटफ़ार्म एक वर सोमवारी दुपारी “कामबंद आंदोलन” केले. यावेळी कामगारांनी मुख्य आरोग्य निरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला.
या कामबंद आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील काही वेळ सफाईचे काम ठप्प होते. यापूर्वी ही रेल्वे स्टेशन वरील सफाई कर्मचाऱ्यांनी पगाराकारिता आंदोलन केले होते. पगाराची थकित रक्क्म त्यांना अजुन पर्यन्त मिळालेली नाही.
अलीकडेच सफाई कंत्राट एकाच कंपनी ला मिळालेला आहे. ज्यात जवळपास २०० कामगार तीन पाळीत सफाई चे काम करतात. माहितीनुसार मध्य रेल्वे नागपुर विभागाचे आरोग्य निरीक्षक कपिल वर्मा यांच्यावर दोन दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. यापूर्वी कंत्राटदाराकडे असलेल्या कर्मचाऱ्याने त्यांना मारहाण केली होती. ऐसा आरोप लावित कर्मचाऱ्यांनी मारहाण कारणाऱ्याला अटक करावी अशी मागणी करत कामबंद आंदोलन पुकारले.
अधिक वाचा : नागपुर : लूटपाट की योजना बनाते ३ आरोपीयो को पुलिस ने धर दबोचा