सिडको जमिन घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा – विरोधकांची मागणी
नागपूर :- उपराजधानित सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये गुरुवारी सकाळी विधानसभेच्या कामकाजास सुरुवात होताच विरोधकांनी दालना पुढे येऊन गोंधळ घातला. विरोधकांनी स्थगन प्रस्ताव द्वारे रायगड येथील जमिन घोटाळ्या प्रकरणी चर्चा करण्याची मागणी केली. घोषणांनी सभाग्रुह दणाणून सोडले. प्रश्न – उत्तराचा तास पुढे ढकलऊन अगोदर या प्रश्नावर चर्चा करा असा तगादा सदनात लाऊन धरला. अखेर सभा अध्यक्षांनी सभाग्रुह काही काळा साठी तहकूब केले. त्यानंतर, सभाग्रुहाला सुरुवात होताच विरोधकांनी पुन्हा तोच विषय लाऊन धरला. त्यानंतर, पुन्हा काही काळा साठी दोनदा सभाग्रुह तहकूब करण्यात आले.
साभागृहाला पून्हा सुरुवात होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले, या जमिन विक्री प्रकरणात राज्य सरकारचा काहीही सहभाग नसून विरोधक राज्य सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत आहे. जमिन घोटाळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि जमिनीचा खरेदी व्यवहार त्वरित रद्द करावा अशी मागणी, काँग्रेस चे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात केली.
अधिक वाचा : संभाजी भिडे यांना त्वरीत अटक करा : आ. प्रकाश गजभिये यांची मागणी