Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवरायांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Date:

स्वराज्य संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) यांची आज जयंती. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. ”छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. सत्य आणि न्याय या मुल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” असे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तसेच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही शिवरायांना (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) शिवजयंतीदिनी अभिवादन केले आहे. मिळालेल्या राजसत्तेचा वापर लोककल्याणासाठी करत, “सार्वभौम स्वराज्य” स्थापन करणाऱ्या महान युगपुरुषास जयंती निमित्त त्रिवार मुजरा!, अशा शब्दांत संभाजीराजेंनी शिवरायांना अभिवादन केले आहे. ”शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले.” असे संभाजीराजेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बालशिवाजी व राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related