दुबई :
सप्टेंबरच्या १९ तारखेपासुन आयपीएलला सुरूवात होत आहे. त्यामुळे आयपीएल संघ दुबईसाठी रवाना होत आहेत. संघाना सहा दिवसांच्या विलगीकरणानंतर सराव करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज मधील बॉलरसह सपोर्ट स्टाफमधील तब्बल १२ जणांना कोरोना लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे संघासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. चेन्नई संघातील सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दुबईमध्ये प्रवेश केल्यानंतर संघातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समजते. दरम्यान, सीएसकेला आणखी एक आठवड्यासाठी विलगीकरण कक्षात रहावे लागणार आहे. चेन्नईचा संघ २१ ऑगस्टला दुबईत दाखल झाला. युएईच्या नियमानुसार त्यांनी सहा दिवस विलगीकरण कक्षात राहण्याचा कालावधी पूर्ण केला होता.
दरम्यान संघातील सपोर्ट स्टाफ आणि अधिकाऱ्यांसह पूर्ण संघाच्या चार कोरोनाच्या चाचण्या करण्यात येणार होत्या. बीसीसीआयच्या नियमनुसार संघाच्या तीन चाचण्या घेण्यात येतील त्यानंतर संघाला सरावासाठी मैदानात उतरण्याची परवानगी देण्यात येणार होती. दरम्यान संघाच्या दोन चाचण्या पार पडल्या आहेत तिसऱ्या चाचणीचा अहवाल उद्या (दि.२९) येणार आहे.