‘चेन्नई एक्सप्रेस’ निर्मात्याची पुन्हा कोरोना चाचणी, प्रकृती अद्यापही….

Date:

मुंबई : काही दिवसांपूर्वी ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटाचे निर्माते करीम मोरनी यांच्या दोन्ही मुलींना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. आता त्याच्या दोन्ही मुलींची अर्थात शजा आणि जोयाची कोरोनाच्या विळख्यातून सुटका झाली आहे. परंतु करीम यांची दुसरी कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये भीतीचं वातावरण आहे. शिवाय कलाविश्वातून देखील त्यांच्या आरोग्यासाठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता हॉलिवूडनंतर बॉलिवूडला देखील कोरोनाची झळ बसत आहे.

सर्वप्रथम करीमयांच्या मोठ्या मुलीला म्हणजे शजा मोरानीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची लहान मुलगी जोयाची देखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. जोयावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. आता तिला रुग्णालयातून डिसचार्ज देण्यात आला आहे.

डीएनएने दिलेल्या वृत्तनुसार, करीम यांना ह्रदय विकाराचा धोका आहे. त्यामध्ये भर म्हणजे त्यांची कोरोनाची दुसरी चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. म्हणून त्यांच्या कुटुंबियांकडून आणि मित्रपरिवाराकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मुंबईच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, योग्य उपचारानंतर सलग दोनवेळा त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना डिसचार्ज देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Also Read- शाहरुख खानने केली 25 हजार PPE किट्सची मदत, आरोग्य मंत्र्यांनी मानले आभार

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related