नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक

Date:

नागपूर : कळमना हद्दीतील नर्मदा नगरातील एका तरुणाला इंजीनिअरची नोकरी लावून देतो, असे अमिष दाखवून तिघांनी संगनमत करीत तब्बल ९० हजाराला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. भोजराज यशवंत घागरे (वय ४०) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. भोजराज यांना अभिमन्यू राव, शकील अली, शिवम या तिघांनी इंजीनिअरची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांनी भोजराज यांना काही माहिती मागितली. त्यानंतर या तिघांनी भोजराज यांच्याकडून एटीएमचा पीन क्रमांक काढून घेतला. काही क्षणातच त्यांना खात्यातून ८९ हजार ६४६ रुपये कमी झाल्याचा मेसेज आला. याप्रकरणी भोजराज यांनी कळमना पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा : नागपूर : क्षुल्लक कारणावरून तलवारीने वार; गंभीर जखमी

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related