हम दिल दे चुके सनम पार्ट 2 ! विवाहित महिलेचं सूत जुळलं; पतीनं लाऊन दिलं लग्न

Date:

छपरा: विवाहबाह्य संबंधांमुळे संसार मोडल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. पण जोडीदारानं विवाहबाह्य संबंध स्वीकारल्याचा प्रकार तुम्ही ऐकला आहे का? बिहारच्या छपरामध्ये एक अशीच घटना घडली आहे. त्यामुळे अनेकांना ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाची आठवण झाली आहे. विवाहित महिलेचं एका व्यक्तीसोबत सूत जुळल्यानंतर तिच्या पतीनं तिचा विवाह त्या व्यक्तीसोबत करून दिला.

छपरामध्ये घडलेल्या घटनेबद्दलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी या घटनेचं वर्ण ‘हम दिल दे चुके सनम पार्ट 2’ असं केलं आहे. पतीनं पत्नी आणि तिच्या प्रियकराचं लग्न एका मंदिरात लाऊन दिलं. त्यानंतर ते मंदिरातून परतत असताना कोणीतरी व्हिडीओ चित्रित केला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. प्रियकरासोबत लग्न केलेल्या महिलेला एक मुलगी आहे. तिच्या प्रियकरानं या मुलीचा स्वीकार केला आहे.

महिलेच्या पतीनं दिलेल्या माहितीनुसार त्यांचा प्रेम विवाह झाला होता. त्यानंतर पत्नी एका व्यक्तीचा प्रेमात पडली. मी आनंदानं त्यांचा विवाह करून दिला. तर प्रियकरासोबत लग्नबंधनात अडकलेल्या महिलेनं पतीवर मारहाणीचा आरोप केला. मी आनंदानं दुसरं लग्न केल्याचं महिलेनं सांगितलं. या महिलेनंच नाव निकी असं आहे.

मी माझ्या मर्जीनं माझ्या पतीशी काडीमोड घेतला असून दुसरं लग्न केल्याचं निकीनं व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. निकीच्या दुसऱ्या पतीनं तिच्या पहिल्या पतीवर छळ केल्याचा आरोप केला आहे. ‘आम्ही ६ महिन्यांपासून सोबत आहोत. यापुढेही सोबत राहू. आम्हाला एक मुलगी आहे. तिचा आम्ही नीट सांभाळ करू,’ असं दुसऱ्या पतीनं म्हटलं.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related