दिवाळी चांगली साजरी करा, अशी चिठ्ठी लिहून; ५५ वर्षीय इसमाची गांधीसागरमध्ये आत्महत्या

Date:

नागपूर : दिवाळी चांगली साजरी करा, आनंदी राहा, अशा आशयाची चिठ्ठी लिहून ५५ वर्षीय इसमाने गांधीसागरमध्ये आत्महत्या केली. निशिकांत वसंतराव सायखेडकर रा. सहकारनगर, खामला, असे मृतकाचे नाव आहे. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास एका इसमाचा मृतदेह गांधीसागरमध्ये तरंगत असल्याचे नारिकांना दिसले. नागरिकांनी गणेशपेठ पोलिसांना माहिती दिली. माहिती  मिळताच गणेशपेठ पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक ए.आर.शिंदे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. जगदीश खरे यांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. पोलिसांना मृतकाच्या खिश्यात चिठ्ठी आढळली. दिवाळी साजरी करा, आनंदी रहा असे त्यात लिहून नातेवाइकांची नावे व मोबाइल क्रमांक दिला होता. पोलिसांनी मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. नातेवाइक आले. ओळख पटली. निशिकांत यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

अधिक वाचा : उपराजधानीतूनच चंद्रपूर, वर्धेला दारूची तस्करी

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related