नवी दिल्ली: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन (CBSE) ने शुक्रवारी 12वी बोर्डाचा निकाल जाहीर केला. सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर हा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 99.37 टक्के विद्यार्थी पास झाले असून, हा आतापर्यंतचा हायएस्ट पासिंग परसेंट आहे. तर, 6149 (0.47) विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, परीक्षेत परत एकदा मुलींनी बाजी मारलेली दिसत आहे. यंदा मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा 0.54% ने जास्त आहे. यंदाच्या परीक्षेत 99.67 मुली तर 99.13 टक्के मुलं पास झाली. सलग सहाव्या वर्षी मुलींना बाजी मारलेली आहे.
निकालाचा फॉर्म्युला
बोर्डान ठरवलेल्या क्रायटेरियानुसार, यंदाचा 12वीचा निकाल 30:30:40 फॉर्म्युलानुसार लावण्यात आला आहे. यात 10वी आणि 11वीतील 5 पैकी 3 सर्वाधिक गुण असलेल्या विषयांना ग्राह्य धरले आहे. तर, 12वीच्या यूनिट, टर्म आणि प्रॅक्टिकल परीक्षांच्या आधारे टक्केवारी काढण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी रिझल्ट कसा पाहावा ?
निकाल पाहण्यासाठी CBSE ची अधिकृत साइट cbseresults.nic.in वर जाऊन 12वी CBSE Results 2021 लिंकवर क्लिक करा. त्यानंतर लॉगइन करुन आपला निकाल पाहता येईल. विद्यार्थी यावरुन निकालाची प्रिंटदेखील काढू शकतात.