नागपुर : नागपूर – वर्धा मार्गावर खडकी शिवारात राज्य परिवहन महामंडळ ची (एसटी) बस पलटी अपघातग्रस्त झाली. घटना सेलू तालुक्यातील असून खडकी शिवारातून बस जात असताना रोही जनावर अचानक बसच्या समोर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली. माहिती नुसार बसमध्ये २० च्या जवळ प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असून १ प्रवासी किरकोळ जखमी झ्यालयाची माहिती आहे.
रस्त्याचा भागात उतार असल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली होती. घटने नंतर बसमधील प्रवासी स्वत: कसेबसे खिडकीमधून बाहेर निघाले, अशी माहिती देण्यात आली. यात १ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती सिंदी रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे. बस क्र. एमएच ४० बीसी १७४६ नागपूर डेपोची असून धम्मपाल वामनराव कांबळे हे वाहक, तर भाऊराव वाघमारे हे बसचे चालक होते. पण बसची स्थिती पाहता मोठा अपघात झाल्याचे कळून येते. पण सुदैवाने एकच प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करुण गुन्हा दाखल केला आहे, पुढे तपास करीत आहे.
अधिक वाचा : युवती के स्कूटी को कार ने मारी टक्कर – मुख्यमंत्री के काफिले के वाहन से हुई टक्कर