मनीष नगर मधील चार फ्लॅटमध्ये घरफोडी

Date:

नागपूर : न्यू मनीषनगरमधील जयंती मेन्शन नऊमध्ये चोरट्यांची हैदोस घालून एकाच दिवशी चार फ्लॅट फोडले. चोरट्यांनी दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

न्यू मनीषनगर मधील प्रभुनगरमध्ये जयंती मेन्शन नऊ आहे. मंगळवारी रात्री अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ए ६०३, ५०१, बी ३०५ व ९०३ या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरी केला. बुधवारी सकाळी या घटना समोर आल्या.

सोसायटीचे सचिव युवराज पांढरीपांडे यांनी बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही व सुरक्षारक्षकही तैनात आहे. असे असतानाही एकाच दिवशी चार फ्लॅटमध्ये घरफोडी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सीसीटीव्ही फूटेजवरून पोलिस घरफोड्यांचा शोध घेत आहेत. चारही फ्लॅटधारक बाहेरगावी आहेत. त्यामुळे घरफोडीत किती रक्कम व दागिने चोरी गेले याची माहिती मिळू शकली नाही.

अधिक वाचा : बहिणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडलेल्या प्रियकराचे चिडलेल्या भावाने केली निर्घृण हत्या, मृतदेह फेकला नाल्यात

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related