राज्यात बुलेट ट्रेन आणि नाणार प्रकल्प होऊ देणार नाही – शिवसेना आमदार गोऱ्हे

Date:

राज्यात बुलेट ट्रेन आणि नाणार प्रकल्प होऊ देणार नाही – शिवसेना आमदार गोऱ्हे

नागपूर :- उपराजधानित बुधवार पासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशन दरम्यान शिवसेनेने अनेक मुद्द्यावर सरकारला घेरायची तयारी केली. यावरून ऐसे निदर्शनात येते की राज्यात भाजप सरकारसोबत असलेल्या शिवसेनेने आता सरकारला डोळे दाखवण्यास सुरवात केलेली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेने अनेक मुद्द्यावर सरकारला घेरले असून नाणारलादेखील विरोध दर्शवला आहे.

मागील दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प आणि बुलेट ट्रेनला आपला विरोध असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. हे दोन्ही मुद्दे विधानसभा आणि विधानपरिषदेत उचलून धरणार असल्याचे शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवसेना कधीही विकासाच्या मुद्यांच्या आड येत नाही अणि येणाराही नाही मात्र हा जनतेचा मुद्दा असल्याने शिवसेना या विरोधात आवाज उठवत असल्याचे गोऱ्हे यांनी पत्रकारांना सांगितले. गोऱ्हे म्हणाल्या बुलेट ट्रेन मुळे अनेक शेतकऱ्याच्या सुपीक जमीन जाणार आहे.गुजरात मधून मुंबई ला विमानाने ये – जा करने शक्य आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन ची गरज नाही आणि नाणार रिफायनरी प्रकल्प राज्यात कोठेही उभारला तरी प्रदुषण होणारच त्यामुळे त्या प्रदूषणाचा त्रास जनतेला होणार आहे.

अधिक वाचा : संभाजी भिडे यांना त्वरीत अटक करा : आ. प्रकाश गजभिये यांची मागणी

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related