नागपूर : सीताबर्डी भागातील अनाधिकृत दुकानांवर नागपूर सुधार प्रन्यासतर्फे कारवाई केली जात आहे. या पाडकाम कारवाईदरम्यान, एक इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. यात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, इमारत पाडण्यासाठी आणलेल्या पोकलेन मशीनचे नुकसान झाल्याचे समजते.
नागपूर शहरात विकासाची कामे सुरू आहेत. या विकास कामांच्या आड येत असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान, नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या सिताबर्डी परिसरात अनेक दुकाने अतिक्रमण करून वसवण्यात आली आहेत. या दुकानांच्या विरोधात नागपूर सुधार प्रन्यासतर्फे गेल्या काही दिवसांपासून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
अधिक वाचा : प्रेयसीच्या साक्षगंधात प्रियकराचा धिंगाणा