सुरक्षेच्या दृष्टीने बुधवार बाजार रविवारी बंद

Date:

नागपूर : विश्व हिंदु परिषदेतर्फे रविवारी (ता. २५) हनुमाननगर येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयामध्ये हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेनिमित्त कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने सक्करदरा येथील बुधवार बाजार रविवारी (ता. २५) बंद ठेवण्यात येणार आहे.

रविवारी (ता. २५) विश्व हिंदु परिषदेच्या वतीने ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयामध्ये विशाल हुंकार सभेचे दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजतादरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या सभेकरिता नागपूर शहर व संपूर्ण राज्यातून लाखोच्यावर जनसमुदाय येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सभेसाठी सकाळपासूनच या परिसरात नागरिकांची गर्दी होण्याचीही शक्यता आहे.

येणारा जनसमुदाय लक्षात घेता कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू यासाठी कार्यक्रम स्थळाच्या परिसरात मोकळी जागा असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयालगत भरणारा बुधवार बाजार हुंकार सभेच्या दिवशी बंद ठेवण्यात यावे, असे आदेश पोलिस विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. या आदेशावर नागरिकांनी सहकार्य करून सक्करदरा येथील बुधवार बाजार बंद ठेवण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

अधिक वाचा : कचरा विलगीकरण करण्याबाबत जनजागृती : नागरिकांनी घेतली स्वच्छतेची शपथ

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related