गर्लफ्रेन्डला लॅम्बॉर्गिनी गिफ्ट देण्यासाठी केला ४० दिवस उपवास; नंतर जे झालं ते वाचून व्हाल हैराण

गर्लफ्रेन्डला लॅम्बॉर्गिनी गिफ्ट देण्यासाठी केला ४० दिवस उपवास; नंतर जे झालं ते वाचून व्हाल हैराण

अनेक तरूण आपल्या गर्लफ्रेन्डला खूश करण्यासाठी असं काही करतात की ते त्यांच्या जीवावर बेततं. सध्या झिम्बॉब्वेतील एक अशीच घटना चर्चेचा विषय ठरत आहे. येथील सेंट चर्चमध्ये काम करणाऱ्या मार्क मुराडजीराला विश्वास होता की, तो उपवास करेल तर देव त्याला दर्शन देतील. त्याला वाटलं तो देवाने दर्शन दिल्यावर त्याला लॅम्बॉर्गिनी कार मागेल. याच विश्वासात त्याने ४० दिवस उपवास करण्याचा निश्चय केला. पण त्यानंतर जे झालं ते वाचून तुम्ही हैराण व्हाल.

देवाला खूश करण्यासाठी या तरूणाने ४० दिवस उपवास करण्याचा निर्णय घेतला. पण ३३व्या दिवशी त्याची तब्येत बिघडली. ज्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. इथे डॉक्टरांनी मोठ्या मुश्कीलीने त्याचा जीव वाचवला. मार्कला जेव्हा शोधण्यात आलं तेव्हा तो फार कमजोर झाला होता. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. चर्चचे बिशप मावरू म्हणाले की, ‘त्याने कमीत कमी नोकरीसाठी तरी उपवास करायचा असता. कारण तो बेरोजगार आहे’.

अशात मार्कच्या काही मित्रांनी त्याच्या मदतीसाठी काही रक्कम जमा केली आहे. ज्यातून त्याचा औषधाचा खर्च भागवला जात आहे. २७ वर्षीय मार्कला जवळपास ३३ दिवसांपासून शोधलं जात होतं. त्याला अखेरचं बघणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, त्याने अनेक लोकांना सांगितलं होतं की, देव त्याला लॅम्बॉर्गिनी कार देणार आहे. त्यामुळे त्याने खाणं-पिणं बंद केलं. पण जेव्हा तो सापडला तेव्हा तो बेशुद्ध मृत्यूची वाटत बघत आढळून आला.

मार्कने हे सगळं केलं कारण त्याला त्याच्या गर्लफ्रेन्डला लॅम्बॉर्गिनी कार गिफ्ट करायची होती. पण त्याच्याकडे पैसे नव्हते. अशात मार्कने उपवास करून देवाकडून कार घेण्याचा विचार केला. त्याला कार तर नाही मिळाली, पण त्याच्या जीवाला नक्कीच धोका झाला. आता जगभरात या घटनेची चर्चा सुरू आहे. सगळे हाच विचार करत आहेत की, एखादी व्यक्ती इतका मोठा मूर्खपणा कशी करू शकते.