मुंबई : महिलांसंदर्भात घाटकोपरचे भाजपचे आमदार राम कदम यांनी बेताल वक्तव्य केल्याचे समोर आले असून सोमवारी दहीहंडी उत्सवाचे राम कदम यांनी आयोजन केले होते. राम कदम यांनी या कार्यक्रमात उपस्थित गोविंदांशी संवाद साधला. राम कदम यांनी गोविंदांना ‘मुलीला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार’; असे आश्वासन दिले. त्याचबरोबर गोविंदाना राम कदम यांनी आपला मोबाइल क्रमांकही यावेळी दिला. विशेष म्हणजे या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती.
दरम्यान, सोशल मीडियावर राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मुलींना लग्नासाठी पळवून आ़णणार आणि तुम्हाला देणार, या वक्तव्यावरून कदम त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम कदम यांनी दहीहंडी उत्सवात गोविंदांशी संवाद साधताना महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे.
बेताल वक्तव्य करणारा भाजपा नेत्यांमध्ये आणखी ऐकाची भर.. रक्षाबंधन , दहिकाला उत्सव या पवित्र सणा दिवशी आमदाराने तोडले आपल्या अकलेचे तारे !
कशा राहतील यांचा राज्यात महिला सुरक्षित? pic.twitter.com/Z5JAx5ewrN— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 4, 2018
बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांमध्ये आणखी ऐकाची भर.. रक्षाबंधन, दहिकाला उत्सव या पवित्र सणा दिवशी आमदाराने तोडले आपल्या अकलेचे तारे ! कशा राहतील यांचा राज्यात महिला सुरक्षित?’ असा सवाल करणारे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून केले आहे. सोबत राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचाही व्हिडिओ पोस्ट केला आहे.
दरम्यान राम कदम यांनी माझ्या बोलण्याचा असा अर्थ नव्हता. ही राजकीय विरोधकांची खेळी, असल्याचे सांगत सारवासारव केली आहे. प्रत्येक मुला आणि मुलीने आपल्या आई-वडिलांचा मान राखला पाहिजे असेच मी म्हटल्याचे राम कदम यांनी प्रसारमाध्यमाशीं बोलाताना सांगितले. त्याचबरोबर या वक्तव्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्याबद्दल मी माफी मागतो, असेही कदम म्हणाले आहे.
अधिक वाचा : चारा घोटाले मामले में लालू प्रसाद यादव ने रांची कोर्ट में किया सरेंडर