उन्नाव बलात्कार प्रकरणात आज कोर्टाचा निर्णय

Kuldeep Singh Sengar

नवी दिल्ली : उन्नाव सामुहिक बलात्कार प्रकरणी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाकडून आज दुपारी ३ वाजता निर्णय देण्यात येणार आहे. या प्रकरणात आमदार कुलदीप सिंह सेंगर प्रमुख आरोपी आहे. तो तिहार कारागृहात कैदेत आहे. कुलदीप सिंह सेंगरवर आरोप सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

४ जून २०१७ मध्ये उन्नाव पीडितेवर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणात कुलदीप सिंह सेंगरसह आणखी एक आरोपी शशि सिंहवरही आरोप लावण्यात आले आहेत. शशि सिंहवर ती पीडितेला सेंगरकडे घेऊन गेल्याचा, पीडितेचं अपहरण केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणात ५ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. पीडितेवर सामुहिक बलात्कार केल्याची दुसरी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तर तिसरी पीडितेच्या वडिलांना मारहाण आणि त्यानंतर पोलीस कोठडीत त्यांच्या मृत्यू झाल्याबाबत दाखल आहे.

त्याशिवाय पाचवी एफआयआर यावर्षी २८ जुलै रोजी साक्ष देण्यासाठी पीडिता अलाहबाद कोर्टात जात असताना रायबरेलीमध्ये तिचा अपघात झाला होता. या अपघातात पीडितेच्या कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला होता. अपघातात पीडिता आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले होते. या अपघात प्रकरणांतही आमदार कुलदीप सिंग सेंगर प्रमुख आरोपी आहे. याप्रकरणी सीबीआयकडून तपास सुरु आहे.

पीडितेसोबत झालेल्या अपघातानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) CBIला ७ दिवसांत चौकशीचे आदेश दिले होते. सोबतच याची सुनावणी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाकडे सोपवण्यात आली होती.