बिहार बोर्ड परीक्षा “लग्न मोडू नये म्हणून मला पास करा, मोठे उपकार होतील”, बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांचे भन्नाट उत्तर

Date:

बिहार बोर्ड परीक्षा देशातील सर्वात जलदगतीनं घेतली जाणारी बोर्ड परीक्षा आहे. बोर्ड परीक्षेचे निकाल लवकरच जाहीर केले जातील. परीक्षेतील कॉपी आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी बोर्डाकडून भरारी पथकं तयार करण्यात आली आहेत. इंटरमिजिएटच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेत काय लिहिलय हे वाचून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. काही विद्यार्थिनींनी मी तुमच्या मुलीसारखी आहे पास करा. लग्न होणार नाही पास करा तर काही जणांनी हनुमानाची भक्ती करण्यासाठी सुट्टी मागितली आहे.

 

भरारी पथकाच्या निदर्शनास आलेला प्रकार
बिहारच्या बोर्ड परीक्षेमध्ये भरारी पथकाला तपासणी करताना उत्तरपत्रिकेवर लिहिलेला मजेशीर मजकूर पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी लिहीलेली उत्तर पाहून भरारी पथकाचे कर्मचारी देखील चक्रावले. ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नांची योग्य उत्तर लिहिता येत नाहीत त्यांनी भन्नाट उत्तर लिहिलेली दिसून आली.

लग्न मोडेल पास करा
बिहार बोर्ड परीक्षा एका विद्यार्थिनीनं लग्न मोडण्याची भीती व्यक्त करत पास करण्याची मागणी केली. त्या विद्यार्थिनीनं लग्न 26 मे रोजी असून नापास झाल्यास लग्न मोडलं जाईल. मी तुमच्या मुलीसारखी आहे. लग्न मोडू नये म्हणून पास करा, मोठे उपकार होतील, असं उत्तरात म्हटलं आहे.

हनुमानाची भक्ती करायचीय सुट्टी द्या
बिहार बोर्ड परीक्षेत भक्ती चळवळी विषयी प्रश्न विचारला असता एका विद्यार्थ्यानं भलतंच उत्तर दिलं आहे. त्यानं महाशय, सविनय निवेदन मी बजरंगबलीचा भक्त आहे. मला हनुमानाची भक्ती करण्यासाठी 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारीदरम्यान सुट्टी द्या, असं म्हटलं आहे. मला परीक्षेत पास करा तुमच्या चरणात लीन होईन, असं एका विद्यार्थ्यानं लिहिलं आहे.

कोरोनाचंही कारण
कोरोना संसर्ग असून देखील बिहारमध्ये बोर्ड परीक्षा सुरु आहेत. लवकरच परीक्षांचा निकाल जाहीर होईल. एका विद्यार्थ्यानं उत्तरामध्ये कोरोना संसर्ग झाल्यामुळे अभ्यास करता आला नाही. त्यामुळे अभ्यास कमी झालाय, पास करा अशी विनंती केली आहे. काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत मोबाईल नंबर देखील लिहीले आहेत.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related