“भारत रत्न” राजीव गांधी जयंती निमित्तकार्यकारी महापौर व्दारा विनम्र अभिवादन
२१ व्या शतकाचे आवाहन स्विकारुन भारताला एक प्रगत राष्ट्र म्हणून पुढे आणण्यासाठी दूरसंचार तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ज्यांचे कार्यकाळात भरीव कामगिरी करण्यात आली असे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या ७४ व्या जयंती निमित्त कार्यकारी महापौर श्री. दीपराज पार्डीकर यांनी अजनी चौक येथील प्रतिमेला नगरीच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन त्यांना विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी माजी आमदार श्री.दीनानाथ पडोळे, माजी नगरसेवक श्री.दिलीप पनकुले, देविदास घोडे, सोपानराव सिरसाट, संजय शेवाळे, राजीव विचारमंच चे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
राजीव गांधी यांच्या जयंती प्रित्यर्थ म.न.पा. केद्रीय कार्यालयात सद्भभावना दिन साजरा कार्यकारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली सदभावनादिन निमित्त सामूहिक प्रतिज्ञा
माजी पंतप्रधान भारत रत्न राजीव गांधी यांच्या 74 व्या जयंती प्रित्यर्थ म.न.पा. तर्फे डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात नगरीचे कार्यकारी महापौर श्री. दीपराज पार्डीकर यांनी भारत रत्न राजीव गांधी यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन आदरांजली वाहिली. तदनंतर त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनी सदभावना दिनाची सामुहिक प्रतिज्ञा दिली.
याप्रसंगी विरोधी पक्षनेते श्री. तानावी वनवे, नगरसेवक श्री.किशोर जिचकार, नगरसेविका श्रीमती उज्वला शर्मा, अपर आयुक्त् श्री. रवींद्र कुंभारे, उपायुक्त श्री. नितीन कापडणीस, परिवहन व्यवस्थापक श्री. शिवाजी जगताप, निगम सचिव श्री. हरिश दुबे, सहा. आयुक्त (साप्रवि) श्री. महेश धामेचा, कार्यकारी अभियंता (विद्युत) श्री. संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता सर्वश्री श्री. डी.डी जांभुळकर, प्रदीप राजगीरे, आर.जी. रहाटे, प्रमुख अग्निशामक अधिकारी श्री. राजेंद्र उचके, शिक्षणाधिकारी श्रीमती संध्या मेडपल्लीवार यांच्यासह मोठया संख्येने कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार जनसंपर्क अधिकारी श्री. अशोक कोल्हटकर यांनी केले. तसेच म.न.पा.विरोधी नेता कार्यालयातील राजीव गांधी यांच्या तैलचित्राला कार्यकारी महापौर श्री. दीपराज पार्डीकर यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी विरोधी पक्षनेता श्री. तानाजी वनवे, नगरसेवक श्री.किशोर जिचकार, नगरसेविका श्रीमती उल्वला शर्मा, निगम सचिव श्री. हरिश दुबे, कार्यकारी अभियंता (स्लम) श्री. डी.डी. जांभुळकर सह बहुसंख्येने कर्मचारी उपस्थित होते.
अप्पाजी गांधी जयंती निमित्त म.न.पा. तर्फे अभिवादन
ज्येष्ठ स्वातंत्र्य सग्राम सैनिक अप्पाजी गांधी यांच्या जयंती निमित्त विवेकानंद वाचनालय महाल येथील त्यांच्या अर्ध पुतळयाला आज म.न.पा. तर्फे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार श्री. यादवराव देवगडे, डॉ. यशवंत बाजीराव, श्री. राजाभाऊ गांधी, मनोज गांधी, मिलींद गांधी, सहा. जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, ग्रंथालयाचे श्री. काळे आदि उपस्थित होते.