नागपुरात विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

Date:

नागपूर : बी. कॉम. अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षांला शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकांक्षा केशव भेंडे (२०) रा. मोटघरे मोहल्ला, हंसापुरी असे मृत तरुणीचे नाव आहे. तिच्या वडिलाचे निधन झाले असून आई व एका बहिणीसह ती राहायची. आई व बहीण खासगी काम करीत असून सोमवारी त्या कामावर गेल्या असता आकांक्षाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

बराच वेळ घराचा दरवाजा बंद असल्याने शेजारी राहणाऱ्या तिच्या आत्याने खिडकीतून डोकावून बघितले असता तिने गळफास घेतलेला दिसला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नदंकिशोर हिंगे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. विद्यार्थिनीच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

अधिक वाचा : पोलिसांना ‘मर्डर’ झाल्याचा फोन करून आत्महत्या

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related