नागपुरात ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या पूर्वसंध्येला बजरंग दलाची रॅली

Date:

नागपूर : व्हॅलेंटाईन डे च्या पूर्वसंध्येला नागपुरात बजरंग दलातर्फे रॅली काढण्यात आली. व्हॅलेंटाईन डे च्या आधी वातावरण निर्मिती करण्याकरिता आणि प्रेमी जोडप्यांच्या मनात धास्ती बसवण्याकरिता या रॅलीचे आयोजन करण्यात आले. प्रेमाच्या नावावर अश्लीलता करणाऱ्या जोडप्यांना बजरंग दल धडा शिकवेल असे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलेले आहे.

व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या विरोधात हिंदूवादी संघटना नेहमीच आक्रमक राहिल्या आहेत. अशात उद्या साजऱ्या होणाऱ्या व्हॅलेंटाईन च्या पूर्वसंध्येला नागपुरातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी लोकमत चौक ते संविधान चौक अशी स्कूटर रॅली काढण्यात आली. यावेळी त्यांनी शहरातील पार्क आणि प्रेमी युगुलांची गर्दी असणाऱ्या ठिकाणाहून ही स्कूटर रॅली फिरवली.

प्रेमाच्या नावाने प्रेमी युगल अश्लीलता पसरवताना आढळल्यास त्यांना बजरंग दल आपल्या स्टाईलने धडा शिकवणार आहे. त्याकरिता गुरुवारी बजरंग दलचा प्रत्येक कार्यकर्ता हा सक्रिय असेल, असेदेखील सांगण्यात आले आहे. प्रेमाला आमचा विरोध नाही. मात्र, अश्लीलतेच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडण्यासाठी बजरंग दलचा प्रत्येक कार्यकर्ता समर्थ असल्याचेदेखील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उद्या नागपुरात बजरंग दलाची भूमिका काय असेल, याकडे प्रेमीयुगुलांचे लक्ष लागलेले असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीसदेखील तत्पर असल्याचे समजते.

अधिक वाचा : प्रेयसीच्या साक्षगंधात प्रियकराचा धिंगाणा

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related