ऑटोचालकांचा वाहतूक शिपायांवर हल्ला

Date:

नागपुर : रस्त्यावर वाहन उभे करणाऱ्या ऑटोंवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या दोन वाहतूक शिपायांवर पोलिसांवर ऑटोचालकांनी हल्ला करून त्यांना जखमी केले. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास गणेशपेठ बसस्थानकाजवळील हॉटेल राहुल डिलक्स समोर घडली. या घटनेने परिसरात काही काही प्रचंड तणाव निर्माण झाला. गणेशपेठ परिसरात ऑटोचालक व खासगी प्रवासी वाहतूक करणारे दादागिरी करीत असून पोलीस आयुक्तांनी तांच्यावर कारवाईची मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोनू कांबळे रा. बेलतरोडी व मयूर राजूरकर रा. रामबाग या ऑटोचालकांना अटक केली. हवालदार किशोर धपके व शिपाई प्रकाश सोनोने,अशी जखमी वाहतूक पोलिसांची नावे आहेत. दोघेही वाहतूक शाखेच्या कॉटन मार्केट झोनमध्ये कार्यरत आहेत. किशोर धपके व प्रकाश सोनोने हे जामर कारवाई पथकात आहेत. दुपारी ते बसस्टॅण्ड भागात कारवाई करीत होते. पोलिसांनी एमएच-४९, ई-४७०७ व एमएच-४९, ई- ०५३० या क्रमांकाच्या ऑटोला जामर लावले. त्यामुळे सोनू व मयूर संतापले. दोघांनी वाहतूक पोलिसांसोबत वाद घातला. वाद विकोपाला केला. दोघांनी वाहतूक पोलिसांना मारहाण करायला सुरुवात केली. तणाव निर्माण झाला. पोलिसांनी ऑटोचालकांना अटक केली.

अधिक वाचा : हेल्मेट न घातल्याने जाब विचारणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Wockhardt Hospitals Introduces Next-gen Robotic Knee Surgery in Nagpur, Empowering Patients to Walk Pain-free Again

MISSO Robotic System brings global orthopaedic technology closer to...

🎉 Black Friday 2025: The Ultimate Guide to Gadget Deals in India

As the holiday season approaches, Black Friday has evolved...

Nagpur Winter 2025: A Season of Chill, Haze & Quiet Magic

As winter unfolds across Nagpur in 2025, the city...

Merry Christmas Wishes 2025

Merry Christmas Wishes 2025 “Wishing you a very merry Christmas...