तरुणीला चांगल्या नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे अत्याचार

Date:

नागपुर :- राज्य सुरक्षा दलात नोकरीवर असलेल्या २६ वर्षीय तरुणीला चांगल्या नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे अत्याचार करणाऱ्या एएसआयविरुद्ध नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी अमित कुमार शर्मा हा दिल्ली येथील आयबीमध्ये नेमणुकीस असून तो झारखंडमधील रहिवासी आहे. नागपूर जिल्ह्यातील पीडित २६ वर्षीय तरुणी ही राज्य सुरक्षा दलात कामाला आहे. २०१६ मध्ये धनबाद येथे कार्यरत असताना तिची आरोपी शर्मासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात झाले.

शर्माने तिला चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्यात भेटी-गाठी वाढल्या. दरम्यान, पीडिता आपल्या गावी आली. ५ एप्रिल २०१६ रोजी आरोपी शर्मा तिला भेटायला नागपूरला आला. यावेळी तो सीए रोडवरील हॉटेल राजहंसमध्ये २०२ क्रमांकाच्या खोलीत थांबला. त्याने पीडितेला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले.

पीडिता त्याला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये आली असता त्याने खाद्यपदाथार्तून तिला गुंगीचे औषध देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर तो तिला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागला.

५ एप्रिल २०१६ ते १५ मे २०१८ पर्यंत आरोपी अत्याचार करत होता. दरम्यान, पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करू लागला. हळूहळू त्याने तिच्याशी दुरावा करीत बदनाम करण्याची धमकी देऊ लागला. प्रेमात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने गणेशपेठ ठाण्यात तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यू. एन. मडावी यांनी सखोल चौकशी केली. तक्रार खरी असल्याचे खात्री पटल्यानंतर आरोपी शर्माविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गणेशपेठ पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

अधिक वाचा: नागपुर : पथ्थर से कुचलकर 17 वर्षीय युवक की ह्त्या, दो आरोपी गिरफ्तार

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related