माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे. वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एम्स’मध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच पंतप्रधान मोदी यांनी एम्सकडे धाव घेतली. वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांनी ४० मिनिटांहून अधिक वेळ एम्समध्ये घालवला. ११ जूनपासून वाजपेयी यांच्यावर एम्समध्ये उपचार करण्यात येत आहेत. वाजपेयी यांना एम्समध्ये दाखल केल्यानंतर मोदींनी एम्समध्ये जावून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. आज पुन्हा एकदा एम्समध्ये जाऊन मोदींनी वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक मंत्र्यांनी एम्समध्ये जावून वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
९३ वर्षीय अटल बिहारी वाजपेयी यांना डिमेंशिया नावाच्या आजाराने ग्रासले आहे. २००९ पासून ते व्हिलचेअरवर आहेत. माजी पंतप्रधान असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अटल बिहारी वाजपेयी हे १९९१, १९९६, १९९९ आणि २००४ साली खासदार म्हणून निवडून आले आहेत.
अधिक वाचा : Former India Test Captain Ajit Wadekar Passes Away at age of 77