नागपुर :- केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते शनिवार शहराच्या जीपीओ (जनरल पोस्ट ऑफिस) शाखेमध्ये संपूर्ण भारतात होऊ घातलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ सोहळा पार पडला I देशात ६५० शाखेत आणि ३ हजार २५० सेवा केंद्रांत हां शुभारंभ सोहळा पार पडला त्याच वेळी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला.
सर्वसामान्य लोक, ग्रामीण शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी तसेच देशाला कॅशलेस करण्यासाठी शासनाची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. संपूर्ण देशभरात १ लाख ५५ हजार पोस्ट सेवा केंद्रे असून यात ३ लाख पोस्टमन कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांमार्फत ही सेवा दिली जाईल. यामुळे ज्या गावात बँक नाहीत अशा ग्रामस्थांना त्यांच्या दारात डिजिटल बँकेची सेवा उपलब्ध होणार आहे.
या योजनेत सरकारी बीमा योजना तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेसाठी पीएनबी मेंटलाईफ वीमा कंपनी सोबत करार करण्यात आला आहे. आईपीपीबी अंतर्गत चालू खात्यापासून ते मायक्रो एटीएम आणि मोबाईल बँकिंग अशा सेवा या केंद्रात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. क्यू कार्डद्वारे ही सेवा ऑपरेट केली जाणार असून यापुढे आता कोणतेही कागदी व्यवहार होणार नाहीत.या योजनेसंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी डिजिटल इंडियाच्या दिशेने हे पुढचे पाऊल असल्याचे मत मांडले आहे.
अधिक वाचा : कार्यकारी अभियंता जांभुळकरसह २४ कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती सत्कार