नागपूर महानगरपालिका, आशीनगर झोन क्र. ९ अंतर्गत कर व कर आकारणी विभागातर्फे थकीत मोठ्या बकाया मालमत्ताधारकांचे मालमत्ता थकीत बकाया कर न भरल्यामुळे नागपूर महानगरपालिका कराधान नियमाच्या अन्वये ५ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
जप्तीची कारवाई सहा. आयुक्त श्री गणेश राठोर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उक्त कारवाईत राजस्व निरिक्षक श्री चंद्रशेखर मोहिते, श्री राजेश कडबे, व कर संग्राहक म्हणून श्री अरुण वैद्य यांनी जप्तीच्या कारवाईत भाग घेतला.
जप्तीमध्ये एकूण ५ मालमत्ता एकूण बकाया राशी ९,११,६३३/- करीत जप्त करण्यात आलेल्या असून मालमत्ता धारकांनी ५ दिवसाच्या आत बकाया कराचा भरणा न केल्यास उपरोक्त मालमत्तेचा लिलाव करून बकाया कर वसूल करण्यात येईल.
करीत नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, त्यांनी आपलेकडील बकाया कराचा भरणा करावा व वॉरंट व जप्ती कारवाई टाळावी .
अधिक वाचा : गणेश विसर्जनाकरिता कृत्रिम टाक्यांची संख्या वाढवा : वीरेंद्र कुकरेजा