Asur 2 | सस्पेंस आणि मिस्ट्रीचा मोठा धमाका, अरशद वारसीची ‘असुर 2’ लवकरच प्रदर्शित होणार!

Date:

मुंबई : गेल्या वर्षी अर्थात 2020मध्ये अनेक उत्कृष्ट वेब सीरीज चाहत्यांसमोर सादर करण्यात आल्या, त्यातील एक ‘असुर’ (Asur) होती. चाहत्यांना आणि प्रेक्षकांना ‘असुर’ वेब सीरीज चांगलीच पसंत पडली होती. या सीरीजमध्ये अरशद वारसी (Arshad Warsi) मुख्य भूमिकेत दिसला होता. मालिकेच्या अपार यशानंतर आता त्याचा दुसरा भाग प्रेक्षकांसमोर सादर केला जाईल (Arshad Warsi Starrer Asur 2 Web series will release soon).

अरशद वारसी स्टारर ‘असुर’ मधील त्याच्या या भूमिकेचे खूप कौतुक केले गेले होते. ‘असुर 2’बद्दल अलीकडेच एक अपडेट समोर आली आहे की, ही मालिका आता चाहत्यांसमोर पुढील नवीन भागांसह सादर केली जाईल.

सस्पेन्स आणि मिस्ट्रीचा तडका
मीडिया रिपोर्टनुसार पहिल्या सीझनचे यश लक्षात घेऊन त्याच्या दुसर्‍या भागाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. नवीन हंगामात पहिल्या हंगामाप्रमाणेच निर्माते सस्पेन्स आणि गूढ सादर करणार आहेत. असे म्हटले जात आहे की, या आठवड्यापासून नवीन मालिकेचे शुटिंगही सुरू होईल. ‘असुर 2’ याचवर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

कशी होती सीरीज?
‘असुर’ ही एक क्राईम थ्रिलर वेब सीरीज होती, ज्यात अरशद वारसीशिवाय अभिनेता बरुण सोबती, अमेय वाघ महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. या सीरीजमधून अरशदने ओटीटी विश्वात पदार्पण केले होते. जिथे 8 भागांच्या पहिल्या हंगामाची कहाणी संपली, तेथून पुढचा हंगाम सुरू होईल.

अरशदची भूमिका
‘असुर’ या वेब सीरीजमध्ये अरशद वारसी सीबीआय अधिकारी धनंजय राजपूतच्या भूमिकेत दिसला होता. या भूमिकेतून अरशदने चाहत्यांवर खोलवर छाप पाडली होती. त्याच वेळी, बरुण सोबती यांनी फॉरेन्सिक तज्ञाची भूमिका केली. अभिनेत्री रिद्धि डोगरानेही यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता नवीन सीरीजची बातमी समोर आल्यानंतर चाहते उत्सुकतेने याची वाट पाहत आहेत. हे इतके स्पष्ट आहे की, असुरच्या सीझन 2 मध्ये चाहत्यांना सस्पेन्सचा दुप्पट डोस मिळणार आहे.

तसेच यावेळची कहाणीही चाहत्यांना अधिक पसंत पडणार आहे. या नव्या भागासाठी अरशदनेही आपली कंबर कसली आहे. तो पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. यावर्षी ही सीरीज कधी रिलीज होईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Holi 2025 in Nagpur: Find the Best Venues to Celebrate with Colors, Music, and Fun!

Holi 2025 in Nagpur is a celebration of a...

Maharashtra Farmers Demand Biotech Breakthroughs to Boost Cotton, Compete Globally

Nagpur : As the debate over biotechnology in Indian...

AI’s Next Steps in the IT Industry

 What is Artificial Intelligence?  Artificial Intelligence (AI) has transformed the...