नागपूर विभागात ९ हजार २९३ स्थलांतरित मजुरांची व्यवस्था!

Date:

नागपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदी दरम्यान नागपूर विभागाच्या पाचही जिल्ह्यात विविध क्षेत्रातील सुमारे ९ हजार २९३ स्थलांतरित मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मजुरांकरीता विशेष शिबिरात व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी दिली आहे.

इतर राज्यातील स्थलांतरित नागरिकांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगाणा, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी राज्यातील आहेत, यामध्ये नागपूर शहर ७५५, नागपूर ५०९, वर्धा १७९४, भंडारा ३४९, गोंदिया १०८५, चंद्रपूर ४३९५, व गडचिरोली ४०६ अशा ९ हजार २९३ स्थलांतरितांचा समावेश आहे.

नागपुरात साधारण १२ मार्चपासून कोरोनाच्या संकटाची चाहूल लागली. पहिल्या दोन आठवडयात एक अंकी असणारी रुग्णसंख्या ही आता साधारणत १७ पॉझिटिव्ह रुग्णांवर स्थिरावली आहे. कोरोनाच्या संसर्गाला थांबविण्यासाठी आरोग्य यंत्रणा व प्रशासन सक्षमतेने काम करत आहे. मात्र कोरोना विषाणूपासून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक मजुरांचा रोजगार बुडाला. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, त्यांच्याही पोटामध्ये दोन घास पडले पाहिजे, आपण जसे दररोज भोजन घेतो तसे त्यांनाही जेवण मिळाले पाहिजे ,त्यांचे जगणे सुलभ होण्यासाठी शासनातर्फे शेल्टर हाऊसची सोय करण्यात आली आहे.

महापौर संदीप जोशी यांनी दिवे लावून दिला एकतेचा संदेश

नागपूर जिल्हयातील हिंगणा येथे मध्यप्रदेशातील कामगार मोठया प्रमाणावर रोजी रोटीसाठी येतात. कोरोनाची चाहुल लागताच कलम १४४ लावल्याने ते हिंगणा येथेच थांबलेत. तातडीने जिल्हा प्रशासनातर्फे रेणुका सभागृहात त्यांना निवारा उपलब्ध्‍ करून देण्यात आला. येथे ३० मार्च पासून साधारण २६ कामगार राहतात. त्यामध्येच कैलास व सविता कैलास मरताम हे दाम्पत्यही आहेत.

रेणुका सभागृहातील या लोकांची सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या सभागृहात थांबलेल्या लोकांसाठी स्वतंत्र बेड देण्यात आले. त्यांना शुध्द पिण्याचे पाण्यासोबतच प्रत्येकाला साबण, टूथपेस्ट, शॅम्पू, बिस्कीट पुडा, केसांना लावायचे तेल, पिण्याच्या पाण्याची बॉटल प्रशासनाने दिली आहे. तसेच बातम्या बघण्याकरीता प्रोजेक्टरची सुविधा, स्वतंत्र भोजन कक्ष, मोबाईलकरीता वाय-फाय आदी सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनाची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी इंदीरा पखाले यांच्या मार्गदर्शानाखाली तहसीलदार संतोष खांडरे मुख्याधिकारी राहुल परिहार, पोलिस निरीक्षक सारीन दुर्गे, असून तलाठी सोनकुसरे, नांदुरकर, दीपक गादे व इतर कर्मचारी कार्यरत आहेत.

Also Read- मरकज से लौटा 32 वर्षीय युवक पाजिटिव

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related