क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीप्रित्यर्थ एपीईआय संघटनेतर्फे महिला सक्षमीकरणावर चर्चा करण्यासाठी जंगल सफारीचे आयोजन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीप्रित्यर्थ तसेच सावित्रीबाईंनी महिला शिक्षण आणि सक्षमीकरण यांच्याकरिता केलेल्या कार्यास अभिवादन करण्याकरिता असोसिएशन ऑफ प्रोग्रसिव एम्प्लाईज ऑफ इंडिया- एपीईआय तसेच गोरेवाडा प्रकल्प नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरता एका विशेष जंगल सफारीचा आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगि महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत येऊन सफारी दरम्यान बसमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल चर्चा केली.
याप्रसंगी शारदा सावळे वर्षा सोनस्कर,रुपा गजभिये यांनी सावित्रीबाई यांच्याद्वारे स्त्रियांच्या उद्धाराकरिता केलेल्या कामाबद्दल माहिती दिली. शोभाताई लांजेवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील गीत सुद्धा सादर केले. अनाया पंचभाई आणि अनुत्तरा ढोबळे या 8 वर्षीय मुलींनी सुद्धा सावित्रीबाईंच्या जीवनावरील प्रसंग सादर केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता असोसिएशन ऑफ प्रोग्रसिव एम्प्लाइज ऑफ इंडियाचे डॉ. किशोर मानकर, गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक प्रमोद पंचभाई, सहाय्यक व्यवस्थापक कल्पना चिंचखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले.