Angrezi Medium Trailer : कॉमेडी ड्रामाचा इमोशनल तडका

Date:

मुंबई, 13 फेब्रुवारी : अभिनेता इरफान खानची प्रमुख भूमिका असलेला अंग्रेजी मीडियम (Angrezi Medium Trailer) हा सिनेमा मागच्या काही काळापासून वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आहे. या सिनेमाचा बहुचर्चित ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ज्यात हिंदी मीडियममध्ये शिकलेला इरफान खाननं आपल्या मुलीच्या परदेशातील शिक्षण घेण्याच्या स्वप्नासाठी झटणाऱ्या बापाची भूमिका साकारली आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीला इरफान खान त्याच्या मुलीच्या शाळेत भाषण देताना दिसत आहे. त्यानंतर त्याची मुलगी त्याला परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा बोलून दाखवते. मात्र समस्या असते ती या शिक्षणासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा. पण इरफान आपल्या मुलीला आश्वासन देतो की, वेळ पडल्यास रक्त विकून तुझ्या फीचा पैसा उभा करेन. पण 3 कोटीची रक्कम जमवणं सोपी गोष्ट नसते… त्यात अनेक समस्या येतात. हा ट्रेलर तुम्हाला हसवतो, विचार करायला लावतो. काही प्रसंगी डोळ्यात पाणीही आणतो आणि पुन्हा हसवण्यात यशस्वी ठरतो.

अंग्रेजी मीडियम या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होण्याआधी इरफान खाननं एक भावूक व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यानं प्रकृतीच्या कारणानं या सिनेमाच्या प्रमोशनला उपस्थित राहता येणार नसल्याची खंत व्यक्त केली.

व्हिडीओमध्ये या सिनेमाच्या सेटवरील काही दृश्य पाहायला मिळत आहेत तर व्हिडीओच्या बॅकग्राउंडला इरफान खानचा आवाज ऐकू येतो. इरफान म्हणतो, नमस्कार माझ्या बंधू-भगिनींनो, मी इरफान. मी आज तुमच्यासोबत आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. पण हा सिनेमा ‘अंग्रेजी मीडियम’ (Angrezi Medium Trailer) माझ्यासाठी खूप खास आहे. या सिनेमाचं प्रमोशन जोरदार करावं आणि त्यात मी सुद्धा सहभागी असावं अशी माझी खरंच खूप इच्छा होती. मात्र माझ्या प्रकृतीच्या कारणानं मी ते करु शकत नाही…. हा सिनेमा तुम्हाला शिकवेल, हसवेल, रडवेल आणि पुन्हा हसवेल… हा सिनेमा नक्की पाहा आणि हो माझी वाट पाहा…

हा सिनेमा येत्या 20 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात इरफान खानसोबत करिना कपूर, राधिका मदन, पंकड त्रिपाठी, किकू शारदा, रणवीर शोरी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मागील वर्षी (2018) त्याला ‘हाय ग्रेड न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर’ चं निदान झालं होतं. मागच्या वर्षी प्रकृतीत सुधारणा झाल्यानं इरफाननं अंग्रेजी मीडियम सिनेमाचं शूट सुरू केलं मात्र या सिनेमाचं शूट संपल्यावर त्याला पुन्हा एकदा उपचारासाठी लंडनला परतावं लागलं.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Max Super Speciality Hospital, Nagpur, Launches Centre of Excellence for Advanced Robotic Joint Replacement

Nagpur :  Max Super Speciality Hospital, Nagpur, has announced...

MMTC-PAMP Launches Its First Exclusive Store in Nagpur, Brings Its 24k, 999.9+ Purest Gold and Silver Portfolio

Nagpur’s inclusion marks a strategic step in MMTC-PAMP's...

Holi Rang Utsav Nagpur 2026 – The Ultimate Festival of Colours

Holi in Nagpur this year is not just a...