‘झुंड’च्या सेटवर बिग बींची २०२२ च्या विश्वचषकाची तयारी

Amitabh Bachchan

नागराज मंजुळे यांचा पहिलाच हिंदी चित्रपट ‘झुंड’चे शूटींग नागपूरात सुरू आहे. यात अमिताभ बच्चन विजय बारसेंची व्यक्तीरेखा साकारत आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना व्यसनापासून दूर करण्यासाठी त्यांच्या फुटबॉलची आवड निर्माण करणाऱ्या अवलियाची भूमिका बच्चन साकारत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी फुटबॉलचा सराव करीत असलेला फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. २०२२ साली होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाची तयारी सुरू असल्याचे त्यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

झुंड‘मध्ये साकारत असलेली फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका आणि त्यांनी पोस्ट केलेला फोटो या घटना जुळवण्याचा प्रयत्न केला तर हे लक्षात येते की, अमिताभ यांचा शूटींगच्या वेळचा हा फोटो आहे. नागपूरातील घरात सुरू असलेल्या शूटींगचे लाईटस फोटो मागे असलेल्या दरवाजाच्यावर दिसतात. ‘झुंड’ या चित्रपटात इतर कोण मुख्य भूमिका साकारत आहेत हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. प्रत्यक्ष फुटबॉल खेळणारे खेळाडू यामध्ये भूमिका करीत असल्याचे समजते.

अधिक वाचा : अमिताभ बच्चन यांचे अखेर चाहत्यांना दर्शन