‘ही’ कंपनी देणार भारतातील टेक सेक्टरमध्ये ४ हजार लोकांना नोकरी

'ही' कंपनी देणार भारतातील टेक सेक्टर मध्ये ४ हजार लोकांना नोकरी

करोना काळ सध्या सुरू असून त्यामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. या दरम्यान, अनेकांना नोकरी मिळणे अवघड झाले आहे. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची पगार कपात करीत आहेत. अशा करोना काळात भारतीयांसाठी टेक सेक्टर मध्ये नोकरी मिळवण्याची एक जबरदस्त संधी मिळणार आहे. अमेरिकेची बँकिंग कंपनी जेपी मॉर्गन (JP Morgan) या वर्षी भारतात हजारो लोकांना नोकरी देण्याचा प्लान करीत आहे.

जेपी मॉर्गनने म्हटले की, यावर्षी भारतात जवळपास ४ हजार अनुभवी टेक्नोलॉजिस्टला आपल्या सोबत जोडायचे आहे. जीपी मॉर्गन मध्ये एचआर इंडिया कॉर्पोरेट सेंटरचे हेड गौरव अहलूवालिया यांनी सांगितले की, टेक्नोलॉजी आमचे ग्राहक यशस्वी आणि बिजनेस स्ट्रेटजीसाठी महत्त्वपूर्ण आहे. आम्ही नेहमीच यांच्या प्रतिेला विकसित करण्यासाठी तयार आहोत. ज्यात क्लाउड डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, मशीन लर्निंग, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सायबर स्पेस सारखे सेक्टरचा समावेश आहे.

जेपी मॉर्गन मध्ये सध्या २.५ लाखांहून जास्त कर्मचारी आहेत. यात ३५ हजार कर्मचारी एकट्या भारतात कार्यरत आहेत. हे सर्व कर्मचारी बेंगळुरू, मुंबई आणि हैदराबादमध्ये सुरू असलेल्या टेक्नोलॉजी अँड ऑपरेशन्स सेंटर मध्ये काम करीत आहेत. हे सेंटर ग्लोबल इंवेस्टमेंट बँकेच्या ऑपरेशनला सपोर्ट करते.

बेंगळुरूच्या टेक सेंटरसाठी होणार ही भरती
टाइम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कर्मचाऱ्यांची भरती जास्तीत जास्त बेंगळुरू मधील टेक सेंटरसाठी केली जाणार आहे. जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमोन यांनी सांगितले की, बँकेने यूएस इंडिया फ्रेंडशी अलायन्ससह कोविड मदतीसाठी २ मिलियन देण्याची घोषणा केली आहे. जेपी मॉर्गन चेस ने भारतात कोविड महामारीला रोखण्यासाठी २० लाख अमेरिकी डॉलरची मदत जाहीर केली आहे. तसेच आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा मदतीचे आवाहन केले आहे.