खोटे वय सांगून केले प्रेम; १४ वर्षाचा मुलाकडून ३६ वर्षीय महिला झाली प्रेग्नंट

खोटे वय सांगून केले प्रेम; १४ वर्षाचा मुलाकडून ३६ वर्षीय महिला झाली प्रेग्नंट

अमेरिकातील जॉर्जिया शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका टीव्ही मुलाखती दरम्यान लीजा क्लार्क या महिलेने धक्कादायक घटनेचा खुलासा केला. एका इंग्रजी पत्रकासाठी मुलाखत देताना तिने सांगितले कि, मी ३६ वर्षांची होती तेव्हा माझ्यासमोर अनेक समस्या होत्या.

लीजा क्लार्क हिने सांगितलं की, माझं पतीसोबत खूप भांडण होत असल्यामुळे आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी माझा मुलगा जवळपास १५ वर्षांचा होता. त्यानंतर माझ्या मुलाच्या एका मित्रासोबत ओळख झाली आणि तो माझा चांगला मित्र झाला, असं लीजा क्लार्कने सांगितले.

लीजा क्लार्क पुढे म्हणाली की, त्या मुलाला भेटली तेव्हा मुलाने त्याचे वय १७ वर्ष आहे असं सांगितलं होतं. त्यानंतर हळूहळू या दोघांमध्ये चर्चा सुरु झाली आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. काही दिवसांनी दोघांनीही शारिरीक संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला.शारिरीक संबंधामुळे काही दिवसांनी लीजा क्लार्क प्रेग्नेट झाली. मात्र याचदरम्यान, लीजा क्लार्कला संबंधित मित्राबाबतची एक धक्कादायक माहिती समोर आली.

लिसाने ज्या मुलाशी प्रेम आणि शारीरिक संबंध ठेवले होते तो मुलगा १७ वर्षाचा नसून त्याचे वय फक्त १४ वर्ष निघाले. हे कळताच लिजाच्या पायाखालची जमिनीचं हादरली कारण, या मुलाने लिसाला आपले खोटे वय सांगून तिच्यावर प्रेम केले. अमेरिकेच्या जॉर्जियामधील कायद्यानुसार हि महिला त्या मुलाचे वय १५ वर्ष होताच त्याच्या सोबत विवाह करू शकते. पण पोलिसांनी या लीजाने १४ वर्षाच्या मुलाशी शारीरिक संबंध ठेवले या कारणावरून तिला अटक केली, असं लीजाने मुलाखतीत सांगितले.